टी-20 वर्ल्ड कपच्या आधी भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कपचाच सराव सामना खेळणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बुधवार 4 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. चाहत्यांना या सामन्यामध्ये प्रवेश मिळणार आहे, पण त्यासाठी तिकीट काढावं लागणार आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्याची तिकीटं 150 रुपये, 300 रुपये आणि 499 रुपयांना आहेत, पण 150 रुपयांची तिकीटांची आधीच विक्री झाली आहे, त्यामुळे आता फक्त 300 आणि 499 रुपयांची तिकीटं शिल्लक आहेत. बुक माय शो वर या सामन्याची तिकीट विक्री सध्या सुरू आहे.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया फक्त एकच सराव सामना खेळणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपचे सराव सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
टी-20 वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सराव सामना- 4 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई, डी.वाय.पाटील स्टेडियम
भारत विरुद्ध युएसए- 7 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वाजता, मुंबई, वानखेडे स्टेडियम
भारत विरुद्ध नामिबिया- 12 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वाजता, दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम
भारत विरुद्ध पाकिस्तान- 15 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वाजता, कोलंबो, आर.प्रेमदासा स्टेडियम
भारत विरुद्ध नेदरलँड्स- 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वाजता, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
