काय म्हणाले किर्ती आझाद?
'टीम इंडियाची लाज वाटते. आम्ही कपिल देवच्या नेतृत्वात 1983 चा वर्ल्ड कप जिंकलो, तेव्हा आमच्या टीममध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन खेळाडू होते. विजयानंतर आम्ही ट्रॉफी आमच्या धार्मिक जन्मभूमीमध्ये भारत, हिंदूस्तानमध्ये आणली. भारताची ट्रॉफी यामध्ये का ओढली जात आहे? मशीद का नाही? चर्च का नाही? गुरूद्वारा का नाही? ही टीम भारताचं प्रतिनिधीत्व करते, सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांच्या कुटुंबाचं नाही. सिराजने कधी मशिदीमध्ये ट्रॉफी नेली नाही, किंवा संजूने चर्चमध्ये ट्रॉफी नेली नाही. संजूने या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होता. ही ट्रॉफी प्रत्येक धर्माच्या भारतीयाची आहे, एका धर्माची नाही', अशी पोस्ट किर्ती आझाद यांनी केली आहे.
advertisement
इशान किशनची प्रतिक्रिया
दरम्यान टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू इशान किशनला याबद्दल विचारण्यात आलं. 'एवढा चांगला वर्ल्ड कप जिंकला आहे, तर चांगला प्रश्न विचारा. किर्ती आझाद काय बोलले, त्यावर मी काय बोलू? चांगला प्रश्न विचारा, किती मजा आली? ते विचारा,' अशी प्रतिक्रिया इशान किशनने दिली आहे.
हरभजनही संतापला
दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आप खासदार हरभजन सिंग यानेही किर्ती आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मंदिरात गेल्यामुळे कुणी राजकारण करत असेल, तर ते हास्यास्पद आहे. कुठे जाणं हा त्यांचा निर्णय आहे. या मुद्द्यावर राजकरण करू नये. माजी क्रिकेटपटूकडून अशा गोष्टी ऐकून खूप दु:ख होतं. देशाने वर्ल्ड कप जिंकला ही मोठी गोष्ट आहे. या मुद्द्यावर राजकरण होऊ नये, कुणी मंदिरात गेलं की मशिदीत. मार्ग एकच आहे. तो त्यांचा विश्वास आहे. कुणाच्याही श्रद्धेवर असे प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत', असं हरभजन सिंग म्हणाला आहे.
