'भारत-पाकिस्तान मॅच झाली नाही, तर त्याचे परिणाम पाकिस्तान क्रिकेटला भोगावे लागतील. प्रत्येक बोर्ड आयसीसीसोबत स्पर्धांआधी करारावर स्वाक्षरी करतो, त्यानंतरच त्यांचा स्पर्धेतला सहभाग निश्चित होतो. पाकिस्तान खेळणार नसेल, तर त्यांच्यावर आयसीसी कायदेशीर कारवाई करू शकते', असं गावसकर म्हणाले आहेत.
अंडर-19 वर्ल्ड कपवरून दाबली दुखरी नस
'मला विचारायचं आहे, भारत-पाकिस्तानची अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली, त्याला का परवानगी दिली? तुम्ही परवानगी दिली, कारण मागच्या वेळी आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या अंडर-19 टीमने टीम इंडियाचा पराभव केला होता. यावेळीही आपण विजय मिळवू आणि भारताची युवा टीम स्पर्धेतून बाहेर होईल, असं तुम्हाला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. भारताविरुद्ध खेळायचंच नसेल तर सगळ्या एज ग्रुपच्या मॅच बंद करा, सीनियर खेळणार नाहीत, पण ज्युनियर खेळतील हे काय आहे?', असा टोला गावसकरांनी लगावला आहे.
advertisement
'पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये जेव्हा जगाच्या, त्यांच्या स्वत:च्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया येतील तेव्हा निर्णय बदलला जाऊ शकतो, यात काय नवीन आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पाकिस्तानचे क्रिकेटपटू निवृत्त होतात. चार दिवसांनंतर ते निवृत्ती मागे घेतात. चाहत्यांनी खेळायला सांगितलं म्हणून आम्ही निवृत्ती मागे घेतली, असं सांगतात. यावेळीही असं होऊ शकतं', अशी खिल्लीही गावसकरांनी उडवली.
पाकिस्तानवर कारवाई व्हावी
'मला वाटते की जर तुम्ही शेवटच्या क्षणी माघार घेतली तर तो एक मुद्दा आहे. जर तुम्ही लवकर माघार घेतली तर तो पूर्णपणे वेगळा विषय आहे. पण जर तुम्ही शेवटच्या क्षणी, स्पर्धेच्या पूर्वसंध्येला माघार घेतली तर आयसीसीने कारवाई करावी. ते काय कारवाई करतील हे मला माहित नाही, पण मला वाटते की इतर अनेक बोर्ड गुंतलेले आहेत, म्हणून हा फक्त एका व्यक्तीचा निर्णय असणार नाही. भविष्यात इतर कोणतीही टीम असे करण्याचा विचार करू नये अशी कारवाई केली पाहिजे', असं गावसकर म्हणाले आहेत.
