TRENDING:

भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, T20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? यावरही शाहबाज सरकारचा निर्णय

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची टीम सहभागी होणार आहे, पण भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे, पण 15 तारखेला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात खेळायला शाहबाज शरीफ सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खेळायला परवानगी दिलेली नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायचं का नाही, याबाबत पाकिस्तान बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली होती, त्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, T20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? यावरही शाहबाज सरकारचा निर्णय
भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, T20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? यावरही शाहबाज सरकारचा निर्णय
advertisement

भारतामध्ये खेळायचं नाही असं सांगून बांगलादेशने त्यांचे टी-20 वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेमध्ये खेळण्याची मागणी केली, पण आयसीसीने बांगलादेशची ही मागणी फेटाळून लावली, त्यानंतर बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला. टी-20 वर्ल्ड कपवरून हा वाद सुरू असताना पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा दिला, तसंच पाकिस्तानकडूनही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली, पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कपवर बहिष्कार न टाकता भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

advertisement

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला टी-20 वर्ल्ड कपचा सामना होणार होता. दोन्ही टीममध्ये श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये आर प्रेमदासा स्टेडियमवर मॅच होणार होती, पण बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तान या सामन्यात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

आयसीसी पासून वाचण्यासाठी पाकिस्तानची आयडिया

जर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीसोबतच ब्रॉडकास्टर्सही पीसीबीला अडचणीत आणू शकतात. तसंच पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रतिबंधही लागू शकतात, यातून वाचण्यासाठी पाकिस्तानने मार्ग काढला आहे. टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकणं ही मुख्य प्राथमिकता नाही, पण पाकिस्तानने 15 फेब्रुवारीच्या भारताविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली आहे. यासाठी पीसीबीकडे ठोस आधार आहे, ज्यामुळे त्यांच्यावर आयसीसीची कोणतीही कारवाई होणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

हा निर्णय बोर्डाने नाही तर सरकारने घेतला आहे, असं पीसीबी आयसीसीला सांगणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, पण राष्ट्रीय सुरक्षा आणि सरकारी आदेशाचं कारण देऊन पाकिस्तान भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणार आहे. सरकारी आदेशानुसार आम्ही भारताविरुद्ध खेळणार नाही, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीला सांगणार आहे, त्यामुळे आयसीसी आपल्यावर कारवाई करणार नाही, असं पाकिस्तानला वाटत आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानचा बहिष्कार, T20 वर्ल्ड कप खेळणार का नाही? यावरही शाहबाज सरकारचा निर्णय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल