TRENDING:

T20 World Cup : 2 पॉईंट्समुळे बदललं वर्ल्ड कपचं समीकरण, भारताच्या 'नॉक आऊट'च्या 3 टीम ठरल्या, कुणाला कधी भिडणार?

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना खेळण्यावर बहिष्कार टाकला आहे, त्यामुळे भारतीय टीम ग्रुप ए मध्ये टॉप करणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना खेळण्यावर बहिष्कार टाकला आहे, पण पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान हा सामना होणार होता, पण आता पाकिस्तानने माघार घेतल्यामुळे या सामन्याचे 2 पॉईंट्स भारताला मिळणार आहेत. भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तानशिवाय युएसए, नामिबिया, नेदरलँड्स या टीम आहेत. सध्याचा फॉर्म बघता टीम इंडिया हे सगळे सामने जिंकण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्रुप ए मधून टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर राहील, हे निश्चित मानलं जात आहे.
2 पॉईंट्समुळे बदललं वर्ल्ड कपचं समीकरण, भारताच्या 'नॉक आऊट'च्या 3 टीम ठरल्या, कुणाला कधी भिडणार?
2 पॉईंट्समुळे बदललं वर्ल्ड कपचं समीकरण, भारताच्या 'नॉक आऊट'च्या 3 टीम ठरल्या, कुणाला कधी भिडणार?
advertisement

टीम इंडियाचे सुपर-8 चे सामने

टी-20 वर्ल्ड कप हा प्री-सीडिंग पद्धतीने खेळवला जाणार आहे. यात प्रत्येक टीमला X आणि Y मध्ये विभाजित करण्यात आलं आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या टीमच्या मॅचची तिकीटं तसंच इतर बुकिंग करण्यासाठी आयसीसीने प्री सीडिंग पद्धत अवलंबली आहे. या प्री सीडिंग पद्धतीमध्ये भारताला X1 नंबर देण्यात आला आहे, तर ऑस्ट्रेलिया X2, वेस्ट इंडिज X3, दक्षिण आफ्रिका X4 असतील. याशिवाय इंग्लंड Y1, न्यूझीलंड Y2, पाकिस्तान Y3 आणि श्रीलंका Y4 असणार आहेत.

advertisement

प्री सीडिंग पद्धतीनेमध्ये जर या 8 टीम व्यतिरिक्त दुसरी टीम सुपर-8 मध्ये क्वालिफाय झाली तर त्या टीमला क्वालिफाय न झालेल्या टीमचा सीड नंबर देण्यात येईल. पण सध्या तरी याच टीम सुपर-8 साठी क्वालिफाय व्हायची शक्यता सर्वाधिक आहे. सुपर-8 मध्ये क्वालिफाय झालेल्या टीमना 4-4 टीमच्या 2 ग्रुपमध्ये विभाजित करण्यात येईल. या परिस्थितीमध्ये टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या टीम असतील. सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारताला या 3 पैकी कमीत कमी 2 सामने तरी जिंकावे लागणार आहेत.

advertisement

भारताच्या सुपर-8 च्या मॅच

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- 22 फेब्रुवारी 2026, अहमदाबाद

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- 26 फेब्रुवारी 2026, चेन्नई

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज- 1 मार्च 2026, कोलकाता

सेमी फायनल 1- 4 मार्च 2026, कोलकाता/कोलंबो

सेमी फायनल 2- 5 मार्च 2026, मुंबई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

फायनल- 8 मार्च 2026, अहमदाबाद

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 2 पॉईंट्समुळे बदललं वर्ल्ड कपचं समीकरण, भारताच्या 'नॉक आऊट'च्या 3 टीम ठरल्या, कुणाला कधी भिडणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल