1 कोटींच्या प्राईसमध्ये किती खेळाडू?
फक्त 9 खेळाडूंनी 1.5 कोटीच्या गटात नोंदणी केली आहे, तर फक्त चार खेळाडूंनी त्यांची बेसिक प्राईज 1.25 कोटी निश्चित केली आहे. 1 कोटींच्या बेस प्राईजच्या यादीत 17 खेळाडू असून 42 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस ही 75 लाख रुपये निश्चित केली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडू आहेत.
advertisement
क्विंटन डी कॉकची सरप्राइज एन्ट्री
डी कॉकचे नाव सुरुवातीला लिलावाच्या यादीत नव्हतं, परंतु एका फ्रँचायझीने त्याची शिफारस केल्यानंतर त्याला लिलावात समाविष्ट करण्यात आलं. विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावलं होतं. त्याचा फॉर्म लक्षात घेता त्याला कोणता संघ घेईल? यावर चर्चा सुरू झाली आहे. याच मुंबई इंडियन्सचा नाव आघाडीवर आहे.
नव्याने सामील झालेल्या खेळाडूंची यादी
परदेशी खेळाडू - अरब गुल (अफगाणिस्तान), माइल्स हॅमंड (इंग्लंड), डॅन लाटेगन (इंग्लंड), क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), कोनोर एडगवेअर (दक्षिण आफ्रिका), जॉर्ज लिंडे (दक्षिण आफ्रिका), बायंडा माजोला (दक्षिण आफ्रिका), ट्रेविन मॅथ्यू (श्रीलंका), बिनुरा फर्नांडो (श्रीलंका), कुसल परेरा (श्रीलंका), दुनिथ वेल्लागे (श्रीलंका), अकीम ऑगस्टे (वेस्ट इंडीज)
भारतीय खेळाडू - सादेक हुसेन, विष्णू सोळंकी, साबीर खान, ब्रिजेश शर्मा, कनिष्क चौहान, आरोन जॉर्ज, जिक्कू ब्राइट, श्रीहरी नायर, माधव बजाज, श्रीवत्स आचार्य, यशराज पुंजा, साहिल पारख, रोशन वाघसरे, यश डिचोलकर, अयाज खान, धुर्मिल पुष्कर वालकर, नारद पारख, ना. अग्रवाल, ऋषभ चौहान, सागर सोलंकी, इजाज सावरिया, अमन शेखावत.
