टीम इंडियाचं ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन
पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सूर्यकुमार यादवने पाकिस्तान क्रिकेटचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता, त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी नाराज न होता, ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केलं. त्यावेळी पाकिस्तानची टीम ड्रेसिंग रुममधून लपूनछपून टीम इंडियाचं सेलीब्रेशन पाहत होती.
advertisement
पाहा Video
कसा रंगला सामना?
पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करताना मजबूत सुरुवात केली, परंतु कुलदीप यादव (4/30) आणि इतर स्पिनर्सच्या भेदक बॉलिंगमुळे त्यांचा डाव 146 रन्सवर गडगडला. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि 20/3 अशी त्यांची स्थिती झाली. मात्र, युवा फलंदाज तिलक वर्मा याने एक संयमी आणि मॅच-विनिंग इनिंग खेळत, नाबाद 69 रन्स (3 फोर आणि 4 सिक्स) केले. त्याला शिवम दुबे (33 रन्स) आणि शेवटी रिंकू सिंग याने विनिंग फोर मारून चांगली साथ दिली. या रोमहर्षक मॅचमध्ये भारताने 5 विकेट्स राखून विजय मिळवत, विक्रमी नवव्यांदा आशिया कपचे टायटल जिंकले.