Ind vs Pak: पाकिस्तानच्या नकवीने ट्रॉफी पळवली, सूर्यानं ट्वीट करत काढला राग, फोटो शेअर करत म्हणाला...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ind vs Pak: भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्विकारणार नाही, अशी भारताने भूमिका घेतली. भारताच्या या भूमिकेनंतर मोहसीन नकवी यांनी थेट आशिया कपची ट्रॉफीच पळवली.
Ind vs Pak Asia Cup Final: आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने एशिया कपमध्ये नवव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. या विजयानंतर भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्विकारणार नाही, अशी भारताने भूमिका घेतली. भारताच्या या भूमिकेनंतर मोहसीन नकवी यांनी थेट आशिया कपची ट्रॉफीच पळवली.
नकवी हे भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी आणि मेडल घेऊन ग्राऊंडमधून बाहेर पडले. या प्रकारानंतर टीम इंडियाने ट्रॉफीशिवाय सेलेब्रेशन केलं. हातात ट्रॉफी असल्याची अॅक्टींग करत संघाने जल्लोष केला. पण या सगळ्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नकवीने ट्रॉफी पळवल्याबद्दल सुर्याने राग व्यक्त केला आहे. त्याने एक्स अकाऊंटवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
"ज्यावेळी सामना संपतो, तेव्हा चॅम्पियन टीम लक्षात राहते. ट्रॉफीचा फोटो नाही," अशा शब्दात सुर्याने राग व्यक्त केला आहे. यावेळी त्याने तिलक वर्मासोबतचा एक फोटोही एक्स अकाऊंटवर पोस्ट केला. ज्यात दोघांच्या हातात आशिया कपची एडिट केलेली ट्रॉफी लावण्यात आली आहे. याच सगळ्या ड्राम्यावर सुर्याने पत्रकार परिषदेत देखील भाष्य केलं.
"माझ्या क्रिकेट कारकिर्दीत हे पहिल्यांदाच घडत आहे..."
advertisement
सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी सुर्याने उत्तर दिलं, "माझ्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत मी कधीही विजेत्या संघाला ट्रॉफी न मिळालेली पाहिली नाही. आशिया कपमध्ये आमच्यासाठी हा एक उत्तम प्रवास होता आणि आम्ही खूप मजा करत आहोत. या काळात आम्हाला खूप मजा आली."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 7:58 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ind vs Pak: पाकिस्तानच्या नकवीने ट्रॉफी पळवली, सूर्यानं ट्वीट करत काढला राग, फोटो शेअर करत म्हणाला...