Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कपची ट्रॉफी चोरली, पण तोच जोश! टीम इंडियाचं ट्रॉफीशिवाय सिलेब्रेशन, पाहा Video

Last Updated:

Team India Celebration Without Asia Cup Trophy : रिंकू सिंगने विजयी शॉट मारून भारताला पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि टीम इंडियाने विक्रमी नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद जिंकले.

Team India Celebration Without Asia Cup Trophy
Team India Celebration Without Asia Cup Trophy
Team India Victory Celebration Without Asia Cup Trophy : 28 सप्टेंबर 2025 रोजी टीम इंडियाने इतिहास रचला. आशिया कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच भिडणाऱ्या पाकिस्तानला टीम इंडियाने जागा दाखवली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 9 व्यांदा आशिया कपवर नाव कोरलं. मात्र, पाकिस्तानने पुन्हा लायकी दाखवली अन् टीम इंडियाला ट्रॉफी उचलू दिली नाही. सामन्यानंतर घडलेल्या दृश्याने संपूर्ण जगाला चकित केले. ट्रॉफी जिंकूनही, भारतीय संघाला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली नाही.

टीम इंडियाचं ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन 

पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सूर्यकुमार यादवने पाकिस्तान क्रिकेटचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता, त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी नाराज न होता, ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केलं. त्यावेळी पाकिस्तानची टीम ड्रेसिंग रुममधून लपूनछपून टीम इंडियाचं सेलीब्रेशन पाहत होती.
advertisement

पाहा Video

advertisement
advertisement

कसा रंगला सामना?

पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करताना मजबूत सुरुवात केली, परंतु कुलदीप यादव (4/30) आणि इतर स्पिनर्सच्या भेदक बॉलिंगमुळे त्यांचा डाव 146 रन्सवर गडगडला. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि 20/3 अशी त्यांची स्थिती झाली. मात्र, युवा फलंदाज तिलक वर्मा याने एक संयमी आणि मॅच-विनिंग इनिंग खेळत, नाबाद 69 रन्स (3 फोर आणि 4 सिक्स) केले. त्याला शिवम दुबे (33 रन्स) आणि शेवटी रिंकू सिंग याने विनिंग फोर मारून चांगली साथ दिली. या रोमहर्षक मॅचमध्ये भारताने 5 विकेट्स राखून विजय मिळवत, विक्रमी नवव्यांदा आशिया कपचे टायटल जिंकले.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कपची ट्रॉफी चोरली, पण तोच जोश! टीम इंडियाचं ट्रॉफीशिवाय सिलेब्रेशन, पाहा Video
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement