Team India vs Pakistan Super 4 Equation : सुपर 4 मधील हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे.कारण सूपर 4 च्या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान एकदम तळाशी गेला आहे. त्यामुळे भारताकडून झालेल्या या पराभवानंतर आता पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं हे कसं शक्य होणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला आहे. या पराभवानंतर पाकिस्तान सूपर 4 च्या गुणतालिकेत अगदी तळाशी गेला आहे. पाकिस्तानचे एका सामन्यात शून्य गुण आहेत. तर त्यांचा रनरेट हा -0.689 वर पोहोचला आहे.त्यामुळे गुणतालिकेत पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे.
सुपर 4 मध्ये प्रत्येक संघ हा तीन सामने खेळणार आहे.त्यातल्या पहिल्या सामन्यात भारता विरूद्ध पाकिस्तानचा पराभव झाला आहे. आता उरलेले दोन सामने पाकिस्तानला काही करून जिंकणे आवश्यक आहे.त्यामुळे पाकिस्तानचा जर पराभव झाला तर त्यांना या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागणार आहे.
आता पाकिस्तानला सुपर 4 मधील दुसरा सामना हा 23 सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध खेळावा लागणार आहे. श्रीलंका ही आशिया कपच्या ग्रुप बी मधली सर्वांत बलाढ्य टीम आहे. साखळी फेरीत श्रीलंका गुणतालिकेत टॉपला होती. पण तरी देखील सुपर 4 मध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांग्लादेशेने त्यांचा पराभव केला होता.त्यामुळे श्रीलंका आता उरलेले दोन सामने जिंकणे आवश्यक आहे.आता श्रीलंकेने जर पाकिस्तानचा पराभव केला तर त्यांच आशिया कपमधलं आव्हान संपूष्ठात येणार आहे. आणि जर श्रीलंका हारली तर त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागणार आहे. त्यामुळे हा सगळ्यात निर्णायक सामना असणार आहे.
पाकिस्तान जर श्रीलंकेविरूद्ध हारली तर त्यांचे आव्हान संपुष्ठात येणार आहे. पण त्यांना तिसरा सामना हा 25 सप्टेंबरला बांग्लादेश विरूद्ध खेळावा लागणार आहे. या सामन्याद्वारे पाकिस्तानला बांग्लादेशचा खेळ बिघडवण्याची संधी असणार आहे.