एआय व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग
रिंकू सिंगने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो मैदानावर सतत सिक्स मारताना दिसत आहे, त्यानंतर कॅप्शनमध्ये विचारले आहे की, "तुम्हाला यश कोणी दिले?" प्रत्युत्तरात, भगवान हनुमान, भगवान शिव, भगवान गणेश आणि भगवान विष्णू काळे चष्मे घातलेले व्हिडिओमध्ये दिसतात.
करणी सेनेची तक्रार
करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित तोमर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, रिंकू सिंगने शेअर केलेल्या हिंदू देवतांचा व्हिडिओ लोकांच्या भावना दुखावतो, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची प्रतिक्रिया स्टेशन हाऊस ऑफिसर मनोज कुमार यांनी दिली आहे.
advertisement
7 फेब्रुवारीपासून भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपच्या या टीममध्ये रिंकू सिंगचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. आयपीएलमध्ये केकेआरसाठी फिनिशरची भूमिका निभावल्यानंतर रिंकूची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली. यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्येही रिंकू सिंगने उत्तर प्रदेशसाठी धमाकेदार कामगिरी केली आहे.
