TRENDING:

Asian Games : ठाण्याच्या रुद्राक्षचा एशियन गेम्समध्ये सुवर्णवेध, भारतीय संघाचं ऑलिम्पिक तिकिटही निश्चित

Last Updated:

रुद्राक्ष पाटील ठाण्याचा असून त्याने एशियन गेम्समध्ये ऐश्वर्य प्रताप सिंग आणि दिव्यांश सिंग पानवार यांच्यासोबत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे, 25 सप्टेंबर : चीनच्या हांगझोऊ इथं एशियन गेम्स स्पर्धेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या पुरुष संघाने हे पदक पटकावलं असून या संघात ठाण्याचा रुद्राक्ष पाटीलसुद्धा आहे. रुद्राक्ष पाटील याच्यासह टीमने केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात पहिलं सुवर्ण पदक जमा झालं.
News18
News18
advertisement

रुद्राक्ष पाटील ठाण्याचा असून त्याने एशियन गेम्समध्ये ऐश्वर्य प्रताप सिंग आणि दिव्यांश सिंग पानवार यांच्यासोबत सुवर्णपदकावर नाव कोरलं.  रुद्राक्ष पाटील आणि संघाने केलेल्या या कामगिरीमुळे पॅरीस येथे होणाऱ्या ॲालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे स्थान पक्के झाले आहे. तिघांनी वैयक्तिक क्वालिफिकेशन राउंडमध्ये १८९३.७ गुण मिळवले. यासोबतच तिघांनी बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनने केलेला याआधीचा विश्वविक्रमही मोडला.

advertisement

शूटिंगशिवाय रोइंगमध्येही आज भारताने एक पदक पटकावलं. रोइंगच्या मेन्स कॉक्सलेस फोर स्पर्धेत जसविंदर सिंह, आशिष, पुनीत कुमार आणि भीम सिंह यांनी कांस्य पदक पटकावलं. भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली असून यात रोइंगमध्ये चार तर शूटिंगमध्ये तीन पदके मिळाली आहेत.

advertisement

चीनच्या हांगझोऊ इथं एशियन गेम्स स्पर्धा सुरू असून सोमवारी स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारताने पाच पदके पटकावली आहेत. आज दोन पदके पटकावली असून क्रिकेटमध्ये भारताच्या महिला संघाला सुवर्ण पदक जिंकण्याची संधी आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : ठाण्याच्या रुद्राक्षचा एशियन गेम्समध्ये सुवर्णवेध, भारतीय संघाचं ऑलिम्पिक तिकिटही निश्चित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल