साऊथ अफ्रिकेच्या खेळाडूंनी हॉस्पिटल गाठलं
दक्षिण आफ्रिकेचे काही प्रमुख क्रिकेटपटू काल रात्री कोलकात्यातील वुड्सलँड्स हॉस्पिटलमध्ये गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. भारतासोबतच्या कसोटी मालिकेतील पहिल्या मॅचनंतर खेळाडूंनी हॉस्पिटल गाठलं. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे शुभमन गिल देखील याच रुग्णालयात भरती होता. काल सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.
advertisement
आरोग्याच्या तक्रारी की आणखी काही?
भारतीय पीचवर मॅच खेळल्यानंतर किंवा प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी असल्यास ते तपासून पाहण्यासाठी ही नियमित तपासणी करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, निश्चित कारण अद्याप समोर आलं नाही. साऊथ अफ्रिका टीम अद्याप कोलकातामध्येच असून खेळाडूंच्या चेकअपनंतर टीम गुवाहाटीला रवाना होईल.
शुभमन गिल जायबंदी
दरम्यान, तर टीम इंडिया देखील अद्याप कोलकाताच्या मैदानावरच आहे. तिथंच टीम इंडियाचा सराव सुरू असल्याची माहिती आहे. शुभमन गिल जायबंदी असल्याने साई सुदर्शन आणि देवदत्त पेडिक्कल या दोन्ही खेळाडूंवर गौतम गंभीर फोकस करताना दिसतोय. त्यामुळे आता टीम इंडिया पुन्हा 7 लेफ्ट हँडर खेळाडूंसोबत मैदानात उतरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
