तिलक वर्माला बर्थडे बॉम्ब
भारतीय संघाने मालिका जिंकल्यानंतर, तिलक वर्मा यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला. तिलक याने स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला बर्थडे बॉम्ब दिले. यावेळी व्हिडिओमध्ये सूर्यकुमार एका काचेत काहीतरी ढवळताना दिसत आहे. त्यावेळी सूर्याने तिलकचा कार्यक्रम करण्यासाठी केक कापण्यासाठी त्याला बसवलं. मला तुझे केस चांगले दिसावेत अशी माझी इच्छा आहे, असं सूर्या तिलकला म्हणतो.
advertisement
पाहा Video
तिलकच्या चेहऱ्यावर केक लावला
सूर्याने तिलकला शर्ट काढण्यास सांगितलं. त्यानंतर तिलक केक कापतो आणि सूर्य त्याच्या डोक्यावर ग्लास ओततो. सूर्यकुमारने तिलकच्या चेहऱ्यावर केक लावला. जवळच उभ्या असलेल्या अर्शदीप सिंगनेही तिलकच्या चेहऱ्यावर केक लावला. तिलकने अर्शदीपला लगेच प्रत्युत्तर दिलं अन् केक अर्शदीपला देखील लावला. त्यानंतर दुसरा केक खाण्यासाठी आलेला शिवम दुबे हसत पळून जाताना दिसतोय.
गौतम गंभीरला हसू आवरेना
दरम्यान, तिलक वर्मासोबत टीम इंडियाच्या खेळाडूंनी फोटो काढले. टीम इंडिया ड्रेसिंग रुममधून हॉटेलवर जाताना हा प्रकार घडला. त्यावेळी गौतम गंभीरला देखील हसू आवरलं नाही. त्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने देखील शेअर केला आहे.
