नाशिकचा रामकृष्ण घोष मागील हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात होता.याच रामकृष्ण घोषवर यंदाच्या वर्षी देखील चेन्नईने विश्वास दाखवून त्याला रिटेन केले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्याला खेळायची संधी मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या वर्षी याच संघातून आयुष्य म्हात्रेने डेब्यू केला होता. हा डेब्यू इतका भारी होता की आता तोच चेन्नई सुपर किंग्जकडून ओपनिंग करताना दिसणार आहे.
advertisement
साहिल पारखने अलिकडेच सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघासाठी पदार्पण केले तो विनू मंकड ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र अंडर-19 संघाचे नेतृत्वही करतो.सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आक्रमक डावखुरा सलामीवीर पारखने भारत अंडर 19 संघाचे प्रतिनिधित्व केले आणि केवळ 75 चेंडूत 14 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 109 धावा फटकावून भारताला केवळ 22 षटकांत 9 विकेटने विजय मिळवून दिला होता.
साहिल पारख पहिल्यांदाच लिलावात उतरणार आहे. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी कोणता संघ उत्सुकता दाखवतो, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर 2025 रोजी अबुधाबी येथे लिलाव पार पडणार आहे. या लिलावात 240 भारतीय खेळाडूंसह 14 सह्योगी देशातील मिळून एकूण 350 क्रिकेटपटूंवर लिलावात बोली लागणार आहे.
