TRENDING:

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी युगांडाचं तिकिट पक्कं, झिम्बॉब्वे बाहेर

Last Updated:

आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कप आफ्रिका विभागातून नामबियाने आधीच तिकिट पक्कं केलं होतं. त्यानंतर आता युगांडाने दुसरं तिकिट मिळवलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली, 30 नोव्हेंबर : आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरत युगांडाने इतिहास घडवला आहे. आफ्रिका विभागात पात्रता स्पर्धेत रवांडाविरुद्ध ९ गडी राखून विजय मिळवत त्यांनी वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवली. २०२४ चा टी२० वर्ल्ड कप अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. पुढच्या वर्षी जून महिन्यात ही स्पर्धा होमार आहे. आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कप आफ्रिका विभागातून नामबियाने आधीच तिकिट पक्कं केलं होतं. त्यानंतर आता युगांडाने दुसरं तिकिट मिळवलं. यामुळे झिम्बॉब्वेचं स्वप्न भंगलं आहे.
News18
News18
advertisement

झिम्बॉब्वेने टी२० वर्ल्ड कपमध्ये तीन सामन्यात विजय मिळवला होता. त्यात पाकिस्तानविरुद्ध एका धावेने मिळवलेल्या विजयाची चर्चा अजूनही होते. आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कपमध्ये आफ्रिका विभागात पात्रता स्पर्धेत सात संघांनी भाग घेतला होता. यात टॉप २ संघ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार होते. युगांडाने सहा पैकी पाच सामने जिंकत पात्रता मिळवली. युगांडाला फक्त नामिबियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

advertisement

झिम्बॉब्वेविरुद्ध युगांडाने पाच विकेटने विजय मिळवला होता. झिम्बॉब्वेला नामिबिया आणि युगांडाविरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. हे पराभव त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर ढकलण्यास कारणीभूत ठरले. . झिम्बॉब्वे २०१९ वर्ल्ड कप आणि २०२३ च्या वर्ल्ड कपसाठीही पात्र ठरले नव्हते. तर टी२० वर्ल्ड कपमध्ये २०२२ मध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली होती. त्यांनी पाकिस्तानला हरवलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी युगांडाचं तिकिट पक्कं, झिम्बॉब्वे बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल