TRENDING:

Team India : चर्चा वैभव-आयुषची पण धमाका भलत्यानेच केला, टीम इंडियाला सापडली हार्दिकची रिप्लेसमेंट, वडीलही होते कॅप्टन!

Last Updated:

भारतीय क्रिकेट टीमला कपिल देव यांच्यानंतर ऑलराऊंडर शोधण्यात बरीच वर्ष गेली, हा शोध हार्दिक पांड्याच्या रुपात संपला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमला कपिल देव यांच्यानंतर ऑलराऊंडर शोधण्यात बरीच वर्ष गेली, हा शोध हार्दिक पांड्याच्या रुपात संपला. सध्या हार्दिक पांड्या फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरची भूमिका चोख पार पाडत आहे, पण त्याला दुखापतींमुळे बऱ्या सामन्यांना आणि महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावं लागलं आहे. हार्दिक पांड्याचा दुखापतीचा इतिहास बघता टीम इंडियाला अनेकदा दुसरा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर नसल्याचा फटकाही बसला आहे, पण आता अंडर-19 क्रिकेटमध्ये नवा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर तयार होत आहे.
चर्चा वैभव-आयुषची पण धमाका भलत्यानेच केला, टीम इंडियाला सापडली हार्दिकची रिप्लेसमेंट, वडीलही होते कॅप्टन!
चर्चा वैभव-आयुषची पण धमाका भलत्यानेच केला, टीम इंडियाला सापडली हार्दिकची रिप्लेसमेंट, वडीलही होते कॅप्टन!
advertisement

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अंबरीशने 4 विकेट घेतल्या, ज्याबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय त्याने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेतली होती.

मूळचा तामिळनाडूचा असलेला आरएस अंबरीश डावखुरा बॅटर आणि उजव्या हाताने मध्यम गती बॉलिंग करतो. खालच्या क्रमांकावर बॅटिंग आणि नव्या बॉलने बॉलिंग करत असल्यामुळे अंबरीश भारताच्या अंडर-19 टीमसाठी उपयुक्त ठरत आहे. बॉलिंग ऑलराऊंडर असलेल्या अंबरीशने सध्या सुरू असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये अंबरीश आठव्या क्रमांकावर बॅटिंग करत आहे.

advertisement

वडीलही होते कर्णधार

2025 च्या शेवटी झालेल्या इंग्लंडच्या अंडर-19 टीमच्या दौऱ्यात अंबरीश वनडे सीरिजमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. अंबरीशचे वडील आर.सुकुमारही क्रिकेटपटू होते, ज्यांनी ज्युनियर क्रिकेटमध्ये टीमची कॅप्टन्सीही केली. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या आर. सुकुमार यांना सीनियर टीममध्ये स्थान मिळवता आलं नाही. रेल्वेमध्ये सुरक्षित नोकरी मिळाल्यामुळे सुकुमार यांना त्यांच्या मुलाचं क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न पूर्ण करता आलं.

advertisement

दुखापतीमुळे अंबरीश आशिया कपमधून बाहेर

इंग्लंडमध्ये चार दिवसांच्या क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावून अंबरीशने बॅटिंगमध्येही आपले कौशल्य दाखवले. तामिळनाडूच्या या तरुण खेळाडूने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात बराच अनुभव आणि यश मिळवले. पण, दुखापतीमुळे तो आशिया कपमधून बाहेर झाला. या धक्क्याने अंबरीश निराश झाला नाही, तर तो वर्ल्ड कपआधी पूर्णपणे फिट झाला.

2025 मध्ये अंबरीशने तामिळनाडूला कुचबिहार ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिला. या स्पर्धेत अंबरीशवर कर्णधारपदाची जबाबदारी होती, जी त्याने उत्तमपणे पार पडली. सेमी फायनल आणि फायनलमध्ये अंबरीशने अमूल्य योगदान दिलं.

advertisement

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्याचा मोठा सन्मान, प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं खास निमंत्रण, Vide
सर्व पहा

आरएस अंबरीश हा ऑलराऊंडर आहे, जो टॉप 6 मध्ये बॅटिंग करू शकतो, याचसोबत नव्या बॉलने बॉलिंगही टाकू शकतो. आरएस अंबरीशचे वडील सीनियर लेव्हलवर क्रिकेट खेळू शकले नाहीत, पण अंबरीशने तामिळनाडूसाठी दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. 18 वर्षांचा झाल्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये अंबरीश आतापर्यंत कोणत्याच टीमकडून खेळलेला नाही, पण येत्या काळात त्याची ही कामगिरी पाहून एखादी टीम त्याला नक्कीच स्थान देईल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : चर्चा वैभव-आयुषची पण धमाका भलत्यानेच केला, टीम इंडियाला सापडली हार्दिकची रिप्लेसमेंट, वडीलही होते कॅप्टन!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल