टीम इंडियाच्या अंडर 19 संघ ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघाविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतो आहे.या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या संघाने ऑस्ट्रेलियाला मायदेशातच धुळ चारली आहे.या विजयासह भारताने 1-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे.
खरं तर टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाने 226 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा अंडर 19 कर्णधार आयुष म्हात्रे 6 धावांवर स्वस्तात बाद झाला होता.त्याच्या पाठोपाठ विहान मल्होत्रा 9 धावांवर बाद झाला.त्यानंतर मैदानात आलेल्या वेदांत त्रिवेदी आणि वैभव सुर्यवंशीने भारताचा डाव सावरला होता.
advertisement
वैभव सुर्यवंशीने आपला नेहमीप्रमाणे आक्रामक खेळ केला होता.या दरम्यान तो 38 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 7 चौकार आणि एक षटकार लगावला होता. त्यानंतर मैदानात असलेल्या वेदांत त्रिवेदीने आणि अभिज्ञान कुंडूने भारताला हा सामना जिंकून दिला होता.वेदांत त्रिवेदीने 61 धावांची नाबाद खेळी केली होती. तर अभिज्ञान कुंडूने 84 धावांची नाबाद धावा केल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंच्या आक्रमक खेळीच्या बळावर टीम इंडियाने 31 ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण करत 7 विकेटसने हा सामना जिंकला.
तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 225 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून जॉन जेम्सने 77 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.त्याच्या व्यतिरीक्त टॉम होगन 41 धावांची खेळी केली होती. या धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 225 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.