Vijay Hazare Trophy 2025-26 : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाने 76 धावांनी दिल्लीचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. विदर्भाच्या या विजयात नागपूरच्या पठ्ठ्याने मोलाची भूमिका बजावली आहे. कारण या खेळाडूने एकट्या दिल्लीचे चार खेळाडू तंबूत पाठवले होते.त्यामुळे विदर्भासाठी हा विजय सोप्पा झाला आणि त्यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
advertisement
खरं तर विजय हजारे ट्रॉफीच्या चौथ्या क्वार्टर फायनल सामन्यात विदर्भ आणि दिल्लीची टीम आमने सामने आली होती. या सामन्यात विदर्भने दिल्लीसमोर 300 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सूरूवात खराब झाली होती. कारण दिल्लीचे दोन्हीही सलामीवीर वैभव कांडपाल आणि प्रियांश आर्या 28 धावांवर बाद झाले होते. त्यानंतर नितीश राणा शुन्यावर बाद झाला. त्याच्यानंतर इतर खेळाडू देखील झटपट आऊट झाले.
दिल्लीकडून अनुज रावतने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली होती. त्याव्यतिरीत्त इतर कोणत्याच खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नाही. त्यामुळे दिल्लीचा संघ 45.1 ओव्हरमध्ये 224 धावांवर ऑलआऊट झाला होता.त्यामुळे विदर्भाच्या संघाने दिल्लीचा 76 धावांनी पराभव केला होता.
विदर्भाकडून नागपूरचा पठ्ठ्या नचिकेत भूटने 7.1 ओव्हरमध्ये 51 धावा देऊन 4 विकेट घेतल्या होत्या.त्याच्यानंतर कॅप्टन हर्ष दुबेने 3, तर प्रफुल हिंगेने 2 आणि यश कदमने 1 विकेट घेतली होती. विदर्भने हा विजय मिळवून सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
दरम्यान याआधी विदर्भ संघाने प्रथम फलंदाजी करताना 300 धावा ठोकल्या होत्या. विदर्भकड़ून यश राठोडने 86 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.त्याव्यतिरीक्त अथर्व तायडेने 62 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर विदर्भने 300 धावांपर्यंत मजल मारली होती.
