लखनऊचा पराभव करत पहिल्या क्वालिफायर सामन्यात पोहोचणाऱ्या बंगळुरू संघाचं आता विजय माल्ल्या यांनी अभिनंदन केले आहे. विजय माल्ल्या यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर लिहले की,लखनऊ संघावर जोरदार विजय मिळवल्याबद्दल आणि आयपीएलमध्ये विजयाचा विक्रम रचल्याबद्दल आरसीबीचे अभिनंदन'. विजय मल्ल्या पुढे लिहितात की, 'मला आशा आहे की मजबूत गती आणि संघातील प्रमुख खेळाडूंच्या पुनरागमनामुळे, आरसीबीचा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकू शकेल'.
advertisement
सोशल मीडियावर ट्रोल
बंगळूरूचे अभिनंदन केल्यानंतर विजय माल्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. एका युझरने विजय माल्या यांच्या पोस्टवर कमेंट केले की,'फरार, भारताचे पैसे परत करा'. दुसऱ्या युझरने लिहिले, 'जर तुमच्यात हिंमत असेल तर फायनल पाहण्यासाठी भारतात या'. तिसऱ्या युझरने सोशल मीडियावर लिहिले, 'जर आरसीबीने यावेळी आयपीएल जिंकले तर बँकेचे कर्ज फेडून परत या... देश तुम्हाला माफ करेल, फक्त ट्रॉफीसोबत एक सेल्फी पोस्ट करा 'घर वापसी'!' दुसऱ्या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर लिहिले, 'बाबाजी, एसबीआयचे पैसे द्या, आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणखी वाढेल'.
किती तारखेला सामना होणार?
प्लेऑफच्या सामन्यांना गुरूवारी 28 मे पासून सूरूवात होत आहे. त्यामुळे क्वालिफायर 1 चा सामना हा पॉईटस टेबलमध्ये पहिल्या स्थानी असलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.हा सामना मुल्लानपूर स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.