पराभवानंतर टीम इंडियाच्या इतर अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट केले. परंतु, रोहित शर्माने वर्ल्ड कप 2023 पासून सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे त्याची मनस्थिती कशी आहे किंवा त्याचे काय चालले आहे. हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच आहे. अशातच रोहित श्रमाची आता त्यांची मुलगी समायरा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
या व्हिडिओमध्ये सामायरा तिची आई रितिका सजदेहसोबत दिसत आहे आणि ती रोहित शर्माबद्दल काहीतरी सांगत आहे. समायराला विचारण्यात आले की तू कशी आहेस? तर समायरा हात हलवताना दिसली. त्यानंतर तिला विचारले गेले की, रोहित कसा आहे? यावर ती म्हणते, "ते त्यांच्या रूममध्ये आहे, ते सकारात्मक आहे आणि महिन्याभरात ते पुन्हा असतील." समयाराचे हे उत्तर अतिशय गोड वाटते.
मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, या व्हिडिओचा वर्ल्डकप 2023 च्या पराभवही काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ वर्ल्ड कप फायनलनंतरचा नसून जुना आहे. वास्तविक, जेव्हा रोहित शर्मा कोविड दरम्यान पॉझिटिव्ह आढळला होता. तेव्हाच हा व्हिडिओ आहे. यामध्ये सामायरा रोहितबद्दल हे सांगत होती. मात्र आता हा व्हिडीओ वर्ल्ड कप 2023 च्या फायनलशी लिंक करून शेअर केला जात आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)