रोहित शर्मा आऊट झाला अन्...
झालं असं की, टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची चांगली सुरूवात दिली. मात्र, 9 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात येणार होता. तर रोहित आऊट होताच क्राऊडने जल्लोष करत विराटचं स्वागत केलं. त्यावेळी रोहित शर्मा मैदानातून बाहेर देखील आला नव्हता. त्यामुळे विराट कोहलीला संताप अनावर झाला अन् त्याने प्रेक्षकांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केलीये.
advertisement
नेमकं काय म्हणाला किंग कोहली?
वेगवेगळ्या सामन्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी हे सर्व घडतं, याची मला जाणीव आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला हे अजिबात आवडलं नाही. मी एम एस धोनी सोबतही असंच घडताना पाहिलं आहे. पॅव्हेलियनमध्ये परत जाणाऱ्या खेळाडूसाठी ही चांगली भावना नसते. मला प्रेक्षकांचा उत्साह समजतो, पण मी मला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याबद्दल जास्त विचार करत नाही, असं कोहली सामन्यानंतरच्या पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये म्हणाला.
माझ्या आईला गुरुग्राममध्ये ट्रॉफी पाठवायला...
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचल्याबद्दल बोलताना विराटनेने हा प्रवास एखाद्या स्वप्नासारखा असल्याचं म्हटलं आहे. त्याने स्वतःच्या कौशल्याची जाणीव असल्याचं सांगत इथंपर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट घेतल्याचे नमूद केलं. माझ्या आईला गुरुग्राममध्ये ट्रॉफी पाठवायला मला आवडतं कारण ती त्या सर्व ट्रॉफी मनापासून जपून ठेवते, असंही विराट कोहलीने यावेळी आवर्जून सांगितले.
