शेवटच्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या डेरी मिचेलने सर्वाधिक 137 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने भारतासमोर 337 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना एकट्या विराट कोहलीने 124 धावांची एकाकी झूंज दिली होती. पण सामना अंतिम टप्प्यात असताना कोहलीची विकेट पकडली आणि भारताने सामना हरला.त्यामुळे डेरी मिचेलच्या या वादळी खेळीमुळे टीम इंडियाचा पराभव झाला होता.
advertisement
या सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन पार पडलं. या दरम्यान विराट कोहली याने स्वत:ची साईन केलेली जर्सी डेरी मिचेलला भेट दिली होती. विशेष म्हणजे ही गोष्ट त्याने एकांतात केली नाही तर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान त्याने ही जर्सी भेट देऊ केली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
कसा रंगला सामना
न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते.रोहित शर्मा एक सिंपल कॅच देऊन बाद झाला. त्याच्यानंतर विराट मैदानात आला. पण तितक्या गिल क्लिन बोल्ड होऊन माघारी परतला होता. त्यानंतक श्रेयस अय्यरची मैदानात एन्ट्री झाली होती.श्रेयस अय्यर विराटसोबत भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. पण तो देखील रोहितसारखाच कॅच आऊट झाला. त्यानंतर नितीश रेड्डी मैदानात आला आणि त्याने अर्धशतकी खेळी केली. पण या खेळीनंतर तो देखील रोहित सारखाच आऊट झाला.
विराट एका बाजूने भारताचा डाव सावरून ठेवला होता तर दुसऱ्या बाजूने एकामागून एक विकेट पडत होते. रविंद्र जडेजापण आऊट झाला. त्याच्यानंतर हर्षित राणाने अर्धशतकीय खेळी केली. विराट सोबतच्या त्याच्या या खेळीने टीम इंडियाची आशा बळावली. पण नंतर हर्षित बाद झाला. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली बाद झाला आणि टीम इंडियाने मॅच हारली होती.
दरम्यान न्यूझीलंडकडून डेरी मिचेलने 137 धावांची शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 15 चौकार लगावले होते. त्याच्यासोबत ग्लेन फिलिप्सने 106 धावांची शतकीय खेळी केली. या खेळी दरम्यान 3 षटकार आणि 9 चौकार मारले होते. या दोन्ही खेळाडूंच्या बळावर न्यूझीलंडने 8 विकेट गमावून 337 धावा केल्या होत्या.
भारत विरूद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20 सामना : 21 जानेवारी 2026, नागपूर संध्याकाळी 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना : 23 जानेवारी 2026, रायपूर संध्याकाळी 7.00 वाजता
तिसरा टी20 सामना : 25 जानेवारी 2026, गुवाहाटी, संध्याकाळी 7.00 वाजता
चौथा टी20 सामना : 28 जानेवारी 2026, विशाखापट्टणम,संध्याकाळी 7.00 वाजता
पाचवा टी20 सामना : 31 जानेवारी 2026, तिरूवनंतपुरम, संध्याकाळी 7.00 वाजता
