Virat Kohli Video : उद्या 11 जानेवारी 2026 पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला सूरूवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना बीसीए स्टेडिअम, कोटांबी, वडोदरामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली जसा लहान असताना दिसायचा, तसाच काहीसा एक चिमुकला त्याच्यासोबत अॅड शूट करताना दिसला होता. या चिमुकल्याला पाहून विराट कोहलीला त्याचं बालपण आठवलं होतं. आणि चाहत्यांना देखीक हा चिमुकला विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसतो असेच वाटते.त्यामुळे हा छोटा विराट कोहली असल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
खरं तर न्यूझीलंड विरूद्ध मालिकेआधी विराट कोहलीने एक अॅड शुट केली होती.या शुटमध्ये टीम इंडियाची जर्सी घातलेले काही चिमुकले खेळाडू आहेत. या शुटनंतर हे खेळाडू विराट कोहलीकडून त्याची ऑटोग्राफ घेतात.या चिमुकल्या खेळाडूंपैकी एक खेळाडू हुबेहुब विराट कोहलीसारखा दिसतो. जर तुम्ही विराट कोहलीच्या बालपणीचा फोटो पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये छोटा विराट दिसेल.
यासोबत व्हिडिओच्या पुढे विराट कोहली येताना दिसत आहे. त्याच्या पुढे हा चिमुकला विराट चालताना दिसत आहे.त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांना विराटच बालपण आठवलं आहे. आणि विराट देखील त्या चिमुकल्याला पाहून शॉक झाला आहे. दरम्यान हा मुलगा कोण आहे,याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे. पण विराट कोहलीच्या व्हिडिओतला चिमुकला प्रचंड चर्चेत आला आहे.
भारत विरूद्ध न्यूझीलंड वनडे मालिका वेळापत्रक
पहिला वनडे सामना : 11 जानेवारी 2026, वडोदरा, दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना : 14 जानेवारी 2026, राजकोट,दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना : 18 जानेवारी 2026, इंदुर, दुपारी 1.30 वाजता
भारत विरूद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20 सामना : 21 जानेवारी 2026, नागपूर संध्याकाळी 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना : 23 जानेवारी 2026, रायपूर संध्याकाळी 7.00 वाजता
तिसरा टी20 सामना : 25 जानेवारी 2026, गुवाहाटी, संध्याकाळी 7.00 वाजता
चौथा टी20 सामना : 28 जानेवारी 2026, विशाखापट्टणम,संध्याकाळी 7.00 वाजता
पाचवा टी20 सामना : 31 जानेवारी 2026, तिरूवनंतपुरम, संध्याकाळी 7.00 वाजता
