अर्शदीप स्टाईलची हुबेहूब नक्कल
विराट कोहली सध्या अतिशय चांगल्या मूडमध्ये असून त्याने प्रॅक्टिस दरम्यान युवा फास्ट बॉलर अर्शदीप सिंहची नक्कल केली. विराटने अर्शदीपच्या धावण्याच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. विराटने केवळ मस्करीच केली नाही, तर नेट्समध्ये 90 मिनिटं घाम गाळून आपली बॅटिंग धारदार केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 77 आणि 131 रन्सची खेळी केल्यानंतर विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असून त्याने स्पिनर्स आणि फास्ट बॉलर्सचा आक्रमकपणे सामना केला.
advertisement
बाउन्सी बॉल्सवर प्रॅक्टिस
टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल यानेही आपला सराव पूर्ण केला असून दुखापतीनंतर तो आता पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. रोहित शर्मा आणि विराटने मिळून थ्रोडाउन स्पेशलिस्ट्सच्या बाउन्सी बॉल्सवर प्रॅक्टिस केली. दुसरीकडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू गुरुवारी मॅच खेळल्यामुळे या सत्रात सहभागी होऊ शकले नाहीत, पण ते लवकरच टीमला जॉईन होतील. रविवारी या सिरीजमधील पहिली मॅच खेळवली जाणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया - शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (व्हाईस कॅप्टन), वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जायसवाल.
