TRENDING:

Yuvraj Singh Samra : युवराज सिंगचा 'तिसरा चेला' चमकला! T20 वर्ल्ड कपमध्ये धमाका, न्यूझीलंडविरुद्ध 58 बॉलमध्ये ठोकली सेंच्युरी!

Last Updated:

Who is Yuvraj Samra : कॅनडाचा युवराज सामरा याने 58 बॉलमध्ये शतक ठोकलं अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासातील शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Canada vs New Zealand : यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2026) अनेक खेळाडू जखमी असल्याने मोठमोठे उलटफेर पहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया असो वा न्यूझीलंड सर्वच टीमचे शॉकिंग रिझल्ट पहायला मिळत आहे. अशातच आता युवराज सिंगच्या तिसऱ्या चेल्याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकत संपूर्ण जगाला धक्का दिला तर गुरू युवराज सिंगला गुरूदक्षिणा दिली आहे. कॅनडाकडून खेळणाऱ्या युवराज सामरा याने धमाकेदार शतक ठोकून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. युवराजच्या शतकाच्या जोरावर कॅनडाने न्यूझीलंडसमोर 173 धावांचा डोंगर उभा केला आहे.
News18
News18
advertisement

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास

कॅनडाकडून खेळणाऱ्या युवराजने आक्रमक बॅटिंग करत न्यूझीलंडच्या बॉलर्सला धू धू धुतलं. सलमीला आलेला युवराज अखेरपर्यंत खेळला. त्याने 58 बॉलमध्ये शतक ठोकलं अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासातील शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

कोण आहे युवराज सिंग सामरा?

कॅनडाच्या टीमकडून टी-20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या युवराज सिंग सामराची गोष्ट मोठी रंजक आहे. त्याचे वडील बलजीत सामरा यांनी आपल्या मुलाचे नाव भारताच्या दिग्गज युवराज सिंगच्या नावावरून ठेवलं. गमतीची गोष्ट म्हणजे, जेव्हा युवराज लहान होता, तेव्हा त्याचे वडील त्याला न सांगता गुपचूप क्रिकेट खेळायला जायचे, जेणेकरून कुणाला त्याचा पत्ता लागू नये.

advertisement

युवराज सिंगचं कनेक्शन काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गृहिणींनो, रिस्क का घेताय? जेवणाची ‘ही’ चूक पडेल महागात, काहीही होऊ शकतं, Video
सर्व पहा

युवराजने खऱ्या युवराज सिंगची दोनदा भेट घेतली आहे. पहिल्यांदा 2019 मध्ये जेव्हा तो टोरंटो नॅशनल कडून खेळत होता आणि दुसऱ्यांदा 2025 मध्ये त्यांची भेट झाली. जेव्हा वडिलांनी भारतीय युवराजला मुलाच्या नावामागचा किस्सा सांगितला, तेव्हा तो फक्त हसून दाद देत होता. वडिलांची इच्छा आहे की मुलाने भारतीय युवराजची कॉपी करावी, पण या पठ्ठ्याला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. मैदानात 360 डिग्री शॉट्स खेळण्यापेक्षा युवराज आपल्या ताकदीवर विश्वास ठेवतो.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yuvraj Singh Samra : युवराज सिंगचा 'तिसरा चेला' चमकला! T20 वर्ल्ड कपमध्ये धमाका, न्यूझीलंडविरुद्ध 58 बॉलमध्ये ठोकली सेंच्युरी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल