सूर्या 11 व्या नंबरवर येण्याची तयारी
आशिया कप स्पर्धेत ओमानविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला बॅटिंगची संधी मिळाली नाही. नेहमी तिसर्या क्रमांकावर खेळणारा सूर्यकुमार यादव भारतानं 8 विकेट्स गमावल्या, तरीही मैदानात उतरला नाही. सूर्या 11 व्या नंबरवर येण्याची तयारी करत होता. मॅचनंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा त्याला याबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने एकाच वाक्याच विषय संपवला.
advertisement
सुर्यकुमारने मस्करीत सांगितलं
सुर्यकुमार यादवने मस्करीत सांगितलं की, 'मी पुढच्या मॅचमध्ये 11 व्या नंबरपेक्षा लवकर बॅटिंगला येण्याचा नक्की प्रयत्न करेन.' या मॅचमध्ये सूर्यकुमारनं बॅटिंग ऑर्डरमध्ये बरेच बदल केले. संजू सॅमसनला नंबर तीनवर पाठवलं. त्याला मिळालेल्या संधीचा त्यानं पुरेपूर फायदा घेत अर्धशतक झळकावलं. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनाही वरच्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली.
मी खऱ्या अर्थानं आनंद घेतला
सूर्यकुमारनं ओमानच्या खेळाचंही कौतुक केलं. 'ओमाननं अविश्वसनीय क्रिकेट खेळलं. त्यांच्या कोचसोबत, सुलु सर (सुलक्षण कुलकर्णी), मला माहित होतं की त्यांच्यात ‘खडूसनेस’ असेल. हे पाहून खूप आनंद झाला, त्यांच्या बॅटिंगचा मी खऱ्या अर्थानं आनंद घेतला.' सुर्यकुमार यादवने अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाचंही कौतुक केलं.
बॉलिंग करणं थोडं कठीण
दरम्यान, 'तुम्ही बाहेर बसलेले असताना अचानक येऊन बॉलिंग करणं थोडं कठीण असतं, पण त्यांनी चांगली कामगिरी केली.', असं सूर्या अर्शदीप आणि हर्षितबद्दल म्हणाला. हार्दिक पंड्याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'हार्दिक ज्याप्रकारे आऊट झाला ते दुर्दैवी होतं. पण तुम्ही त्याला मॅचमधून दूर ठेवू शकत नाही, तो ज्याप्रकारे बॉलिंग करतो, ते अविश्वसनीय आहे.'