रोहित शर्माला पत्रकार परिषदेत गिलच्या दुखापतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'गिल लवकरात लवकर बरा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्याला पूर्णपणे फिट व्हायची संधी देऊ. तो तरुण आहे, शरीर फिट असल्यामुळे तो लवकर बरा होईल,' असं रोहितने सांगितलं. पहिल्या सामन्यात गिलच्या खेळण्याची शक्यता रोहितने फेटाळलेली नाही.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार शुभमन गिलला डेंग्यू झाला आहे. गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे तो जर खेळला नाही तर भारतीय टीमला मोठा धक्का बसेल. मेडिकल टीम शुभमन गिलवर लक्ष ठेवून आहे, त्याला आता बरं वाटत आहे. तो अजूनही पहिल्या सामन्यातून बाहेर झालेला नाही, आम्ही त्याच्याबद्दल उद्या निर्णय घेऊ, असं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितलं.
advertisement
टीमसाठी जे करता येईल ते करण्यावर माझा फोकस असेल, टीमला चांगली सुरूवात द्यायचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली. तसंच देशासाठी वर्ल्ड कप खेळणं माझ्यासाठी अभिमानाचं असल्याचंही रोहित म्हणाला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताला आशियाई स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालं, याबद्दलही रोहित शर्माने टीमचं अभिनंदन केलं.