खरं तर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजीला उतरली होती.यावेळी आरसीबीच्या लॉरेन बेलने 5 धावांवर 2 विकेट काढल्या होत्या. यावेळी लिझेली ली आणि लॉरा वोव्हार्टला स्वस्तात बाद केले होते. त्यानंतर कॅप्टन जेमीमा रॉड्रीग्जने 4 धावा करून बाद झाली होती. त्यानंतर मेरीजन कॅप शुन्यावर बाद झाली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे 10 धावांवर 4 विकेट पडले होते. इथून पुढे दिल्लीचा डाव ऑलआऊट होईल असे वाटत होते.
advertisement
पण टीम इंडियाच्या शेफाली वर्माने दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरला होता. शेफाली वर्मा याने यावेळी 41 बॉलमध्ये 62 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 5 चौकार मारले होते. या दरम्यान तिने एकटीने 97 बॉल फलंदाजी केली होती.तिच्यासोबत लुसी हेमिल्टनने 19 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 3 चौकार आणि 3 षटकार मारले होते. त्यामुळे या धावाच्या बळावर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 166 धावा केल्या होत्या.
आरसीबीकडून यावेळी लॉरेन बेल आणि सायली सातघरेने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या होत्या. तर प्रेरणा रावतने 2 आणि नदीने डी क्लार्कने 1 विकेट घेतली होती.
