मुंबईने 19व्या ओव्हरमध्ये केल्या 3 चुका
मुंबई इंडियन्सने बॉलिंगवेळी 19व्या ओव्हरमध्ये केलेल्या 3 चुका त्यांना चांगल्याच महागात पडल्या. ओव्हरच्या पहिल्याच बॉलला स्कीव्हर ब्रंटने डे क्लार्कचा सोपा कॅच सोडला, यानंतर चौथ्या बॉलला केरनेही कॅच सोडून डे क्लार्कला जीवनदान दिलं. केरने कॅच सोडल्यानंतर क्लर्क दुसरी रन धावायला गेली, तेव्हा अमनजोतने बॉल विकेट कीपर कमालिनी कडे थ्रो केला, पण स्टंप उडवत असतानाच कमालिनीच्या हातातून बॉल सटकला. स्क्रीव्ह ब्रंट, केर आणि कमालिनीच्या या चुका मुंबईला चांगल्याच महागात पडल्या.
advertisement
नदिने डे क्लार्कने 44 बॉलमध्ये नाबाद 63 रनची खेळी केली. तर ग्रेस हॅरिसने 25, अरुंधती रेड्डीने 20 आणि कर्णधार स्मृती मानधनाने 18 रनची खेळी केली. मुंबईकडून निकोला कॅरी, अमेलिया केर यांना 2-2 विकेट मिळाल्या. याशिवाय स्कीव्हर ब्रंट, शबनिम इस्माईल आणि अमनजोत कौर यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 154/6 पर्यंत मजल मारली. सजीवन सजनाने 25 बॉलमध्ये 45 आणि निकोला कॅरीने 29 बॉल 40 रन केले. याशिवाय कमालिनीने 32 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 रनची खेळी केली. आरसीबीकडून नदिने डे क्लार्कने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय लॉरेन बेल आणि श्रेयांका पाटील यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
