WPL 2026 Retentions Royal Challengers Banglore Retentions List : वुमेन्स आयपीएल 2026 ला अजून खूप अवकाश आहे. पण त्याआधी वुमेन्स प्रिमियर लीगमधल्या सगळ्याच संघांनी आज रिटेन्शन यादी जाहीर केल आहे. या दरम्यान रॉयल चँलेंजर्सं बंगळुरूने मोठा डाव टाकला आहे. आरसीबीने थेट वर्ल्ड कप विनर खेळाडूंना संघात स्थान कायम ठेवलं आहे.त्यामुळे आरसीबीच्या रिटेंन्शन यादीत नेमके कोण कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
वुमेन्स प्रीमियर लीग 2026 ची तयारी सुरू झाली आहे. सर्व संघ आगामी हंगामासाठी तयारी करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आगामी हंगामासाठी त्यांची रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. यावेळी संघाने वुमेन्स वर्ल्ड कप विजेती असलेल्या स्मृती मानधना कर्णधाराला कायम ठेवले आहे. तिच्या सोबत तीन स्टार खेळाडूंना कायम ठेवले.
आरसीबीने आगामी हंगामासाठी कर्णधार स्मृती मानधना, एलिस पेरी, रिचा घोष आणि श्रेयंका पाटील यांना कायम ठेवले आहे. या खेळाडूंनी आरसीबीसाठी असाधारण कामगिरी केली आहे. स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने 2024 मध्येही त्यांना जेतेपदापर्यंत नेले.
रिटेन्शन केलेले तीन खेळाडू
आरसीबीने मानधना यांना ३.५ कोटी रुपयांना, तर रिचा घोष यांना २.७५ कोटी रुपयांना रिटेन्शन केले आहे. शिवाय, एलिस पेरी यांना १ कोटी रुपयांना, तर श्रेयंका पाटील यांना ६० लाख रुपयांना रिटेन्शन केले आहे. याशिवाय, 14 खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे.
दरम्यान आरसीबीने रीटेन केलेल्या खेळाडूंमध्ये दोन वर्ल्ड कप विनर खेळाडू आहेत. एक स्मृती मानधना आणि एक रिचा घोष या दोघी आहेत.या व्यतिरिक्त वर्ल्ड कप खेळलेल्या एकालाही संघात कायम ठेवले गेले नाही आहे.
आरसीबीने रिलीज केलेले खेळाडू
फलंदाज - डॅनी व्याट-हॉज, सब्बिनेनी मेघना
वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू - सोफी डेव्हाईन, राघवी बिस्ट, जोशिता व्हीजे
स्पिन-बॉलिंग अष्टपैलू खेळाडू - आशा शोबाना, चार्ली डीन, जॉर्जिया वेअरहॅम, कनिका आहुजा, प्रेमा रावत
वेगवान गोलंदाज - रेणुका सिंग, केट क्रॉस
स्पिनर - एकता बिश्त, जगरावी पवार
