चेहऱ्यावर एक निरागस हास्य
मुलाखत सुरू असतानाच गौतमीला सांगण्यात आले की, खुद्द हार्दिक पांड्याने तिच्यासाठी एक खास मेसेज पाठवला आहे. हे ऐकून तिला आपला कानवर विश्वासच बसला नाही. "सिरियसली?" असा प्रश्न विचारत तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य उमटले. आपल्या लाडक्या खेळाडूने आपल्या खेळाची दखल घेतली, हे पाहून गौतमी प्रचंड भारावून गेली होती.
advertisement
पहिल्या अर्धशतकाबद्दल अभिनंदन
हार्दिकने आपल्या मेसेजमध्ये गौतमीचे तिच्या पहिल्या अर्धशतकाबद्दल अभिनंदन केले. "हाय गौतमी, मला समजले की मी तुझा आदर्श आहे, हे ऐकून खूप छान वाटले. तुझ्या पहिल्या अर्धशतकाबद्दल तुझे खूप अभिनंदन," असे हार्दिक म्हणाला. त्याने तिला खेळाचा आनंद घेण्याचा आणि शिस्त पाळून देश व फ्रँचायझीसाठी मोठी कामगिरी करण्याचा मोलाचा सल्लाही दिला.
पाहा Video
दरम्यान, डब्ल्यूपीएल सारख्या व्यासपीठामुळे स्थानिक खेळाडूंचे कौशल्य जगासमोर येत आहे. गौतमी नाईकसारख्या तरुण खेळाडूला मिळालेली ही पावती तिच्या आगामी कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सराव करता आणि तोच खेळाडू तुमच्या खेळाचे कौतुक करतो, तेव्हा त्या खेळाडूचा आत्मविश्वास द्विगुणित होतो, हेच गौतमीच्या चेहऱ्यावरील हास्याने सिद्ध केले.
