काय म्हणाले योगराज सिंग?
अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी पंजाब किंग्जच्या कर्णधाराने आपली विकेट गमावली, ज्यामुळे आरसीबीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आणि पंजाब संघ दबावाखाली आला. श्रेयस अय्यरच्या या शॉटमुळे योगराज सिंग विशेषतः निराश झाले, त्यांनी या शॉटला 'गुन्हेगारी कृत्य' (criminal offence) असं संबोधलं आणि यासाठी कोणतीही माफी नसावी असं म्हटलं आहे.
advertisement
कोणतीही माफी नाही - योगराज सिंग
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग म्हणाले, "फायनलमध्ये श्रेयस अय्यरने जो शॉट खेळला, तो माझ्या मते एक गुन्हेगारी कृत्य आहे. अशोक मांकड यांनी मला या गुन्हेगारी कृत्याबद्दल सांगितलं होतं, जे कलम ३०२ (Section 302) अंतर्गत येते. त्यांनी मला असंही सांगितले की याचे परिणाम असे होतील की तुम्हाला दोन मॅचसाठी बॅन केले जाईल". श्रेयसने काल जे केले ते स्वीकारार्ह नाही. यासाठी कोणतीही माफी नाही, असं योगराज सिंग यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे, याच मैदानावर मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या क्वालिफायर-२ सामन्यात अय्यरने ८७ नॉट आऊट (४१) धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याची विकेट पंजाबला मॅच जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसली.