योगराज सिंग यांनी याआधी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. एकेकाळी मी कपिल देव यांना ठार मारण्यासाठी पिस्तूल घेऊन त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला होता.जेव्हा कपिल देव यांनी आपल्याला भारतीय संघातून वगळले होते तेव्हा आपण असा निर्णय घेतला होता, असे योगराज म्हणाले. योगराज यांनी भारताकडून 1980-81 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले होते.
advertisement
कपिल देव यांच्याविरोधातील राग व्यक्त करताना योगराज म्हणाले, कपिल देव जेव्हा भारत, नॉर्थ झोन आणि हरियाणाचा कर्णधार झाला तेव्हा त्याने मला कोणत्याही कारणाशिवाय संघातून वगळले होते. माझ्या पत्नीला वाटले की मी याबाबत कपिल देवला जाब विचारावा. पण माझ्या मनात होते की त्याला धडा शिकवावा. मी पिस्तूल बाहेर काढले आणि सेक्टर ९ मधील कपिलच्या घरी गेलो. तो त्याच्या आईसोबत बाहेर आला. मी त्याला शिवीगाळ केली आणि म्हटले की, तुझ्यामुळे मी माझा मित्र गमावला आहे आणि तू जो काही केलास त्याची किंमत तुला मोजावी लागेल. तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे, पण मी असे करणार नाही कारण तुझी आई इथे उभी आहे. मी शबनमला (माझ्या पत्नीला) म्हटले, चल घरी जाऊया. त्या क्षणी मी ठरवले की यापुढे क्रिकेट खेळणार नाही. पण युवराजला क्रिकेटपटू करेन.
जय शहांच्या जागी BCCIमध्ये आले नवे बॉस, कोषाध्यक्ष म्हणून या व्यक्तीची निवड
बिशन सिंग बेदींनी कट रचला
योगराज यांनी फक्त कपिल देव यांच्यावर आरोप करुन थांबले नाहीत. त्यांनी दिवंगत क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांच्यावरही आरोप केले. भारताचे माजी गोलंदाज बेदी यांनी माझ्याविरुद्ध कट रचल्याचे योगराज म्हणाले. मला जेव्हा संघातून वगळण्यात आले तेव्हा मी निवड समितीचे सदस्य असलेल्या रविंद्र चढ्ढा यांच्याशी बोललो तर ते म्हणाले, निवड समितीचे प्रमुख बिशन सिंग बेदी यांना मला संघात घेण्याची इच्छा नव्हती. कारण त्यांना वाटत होते की, मी सुनील गावस्कर यांचा माणूस आहे आणि मुंबईतून क्रिकेट खेळत होतो.
भारतासह जगात असणार फक्त १५ देश, नवा नकाशा तुम्ही पाहिलात का?
कपिल देव यांनी माफी मागितली
योगराज यांनी यावेळी असा ही दावा केला की, कपिल देव यांनी त्यांच्याशी माफी मागितली. त्याने (कपिल देव) मला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला. पुढच्या जन्मी आपण भाऊ असू. पुढच्या जन्मी आपण एका आईच्या पोटी जन्म घेऊ. तो मला भेटण्याची इच्छा व्यक्त करत होता. पण अजूनही त्याची वेदना आहे,असे योगराज म्हणाले.