New World Order Map: पाकिस्तान, अफगाणिस्तान गायब! भारतासह जगात असणार फक्त १५ देश, नवा नकाशा तुम्ही पाहिलात का?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
जगाचा असा नकाशा ज्यात फक्त 15 देश असतील तर जग कसे दिसेल? 82 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला न्यू वर्ल्ड ऑर्डर मॅप आता अचानक का व्हायरल होत आहे. जाणून घ्या...
मुंबई: संयुक्त राष्ट्र संघटनेनुसार जगात १९३ देश आहेत. या शिवाय असे दोन देश आहेत जे UNचे सदस्य आहीत त्यातील एक म्हणजे व्हॅटिकन सिटी आणि दुसरे म्हणजे पॅलेस्टाइन होय. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया,अंटार्क्टिका आणि आर्क्टिक असे सात खंड आहेत. पण फक्त विचार करा जर जगात फक्त १५ देश असतील तर जगाचा नकाशा कशा दिसेल? सध्या सोशल मीडियावर जगाचा एक नकाशा व्हायरल होत आहे.
न्यू वर्ल्ड ऑर्डर मॅप अशा नावाने ओळखला जाणारा हा नकाशा काही नवा नाही तर दुसऱ्या महायुद्धाच्या आधी तयार करण्यात आलेला आहे. ८२ वर्ष जुना हा नकाशा आताच अचानक का व्हायरल होऊ लागला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर डोनाल्ड ट्रम्प असे आहे. ट्रम्प लवकरच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्याआधी त्यांनी कॅनडाला अमेरिकेचे ५१वे राज्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. फक्त कॅनडा नाही तर ट्रम्प यांना ग्रीनलँडही ताब्यात घ्यायचे आहे. आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, ट्रम्प फक्त एवढ्यावर थांबतील का? कॅनडा, ग्रीनलँडनंतर ते मॅक्सिकोकडे का वळणार नाहीत. यामुळेच सोशल मीडियावर युझर्सनी न्यू वर्ल्ड ऑर्डर मॅप व्हायरल करण्यास सुरूवात केली.
advertisement
जय शहांच्या जागी BCCIमध्ये आले नवे बॉस, कोषाध्यक्ष म्हणून या व्यक्तीची निवड
न्यू वर्ल्ड ऑर्डर मॅप (New World Order Map) प्रथम 1942 प्रकाशित करण्यात आला होता. मॉरिस गोम्बर्ग यांनी अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात हा मॅप प्रकाशित केला. तेव्हा मॉरिस यांनी असा दावा केला होता की, दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या नकाशात मोठे बदल दिसून येतील आणि जगात फक्त 15 देश अस्तित्वात असतील. मॉरिस गोम्बर्ग मूळचे रशियाचे होते. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांच्या मते अमेरिका एक मोठी लष्करी ताकद असलेला देश होईल. ज्यात कॅनडासह अनेक देशांचा समावेश होईल. या मॅपमध्ये रशिया म्हणजे तेव्हाचा USSR देखील मोठा देश असल्याचे दाखवले होते. ज्यात आजचे इराण, मंगोलिया, फिनलँड आणि संपूर्ण पूर्व युरोपचा समावेश करण्यात आला होता.
advertisement
भारताचा अखंड नकाशा
मॉरिस यांनी भारताचा मोठा असा नकाशा दाखवला होता. जो अखंड भारताच्या संभाव्य नकाशाशी मिळता-जुळता आहे. यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमारला भारताचा भाग दाखवले आहे. तर सध्याच्या चीनच्या जागी मॉरिस यांनी एकत्रित चीनी गणराज्य (URC) दाखवले. यात दक्षिण आणि उत्तर कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड आणि मलायाच्या मोठ्या भागाचा समावेश आहे.
advertisement
A 1942 Map of the New World Order
The map shows Greenland, Mexico, and Canada as part of the United States of America.
Published in Philadelphia in early 1942, this "Outline of the Post-War New World Map" proposed a reorganization of the world following an Allied victory over… pic.twitter.com/6CPW5z46JS
— Shadow of Ezra (@ShadowofEzra) January 8, 2025
advertisement
युरोपचा संयुक्त नकाशा
जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, स्पेन, पोर्तुगाल आणि इटली यांचा समावेश करून मॉरिस यांनी संयुक्त राज्य युरोप (USE) तयार केले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 12, 2025 5:54 PM IST
मराठी बातम्या/Viral/
New World Order Map: पाकिस्तान, अफगाणिस्तान गायब! भारतासह जगात असणार फक्त १५ देश, नवा नकाशा तुम्ही पाहिलात का?