Longest Working Hours: आठवड्याला सर्वाधिक काम करणारा देश आहे भारताचा शेजारी, टॉप १० मध्ये देशांची यादी वाचा

Last Updated:

90 Hour Work: L&T कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आणि कामाच्या तासावरून देशात मोठी चर्चा सुरू झाली. या चर्चेच्या आधीपासून भारत हा जगातील सर्वाधिक काम करणाऱ्या देशांच्या यादीत टॉप 10 मध्ये आहे. जाणून घ्या अव्वल स्थानी कोण आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारतात सध्या सध्या आठवड्याला 90 तास कामचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. लार्सन अँड टुब्रो (L&T)कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आणि त्यावरून वादाला सुरुवात झाली. एखाद्या मोठ्या कंपनीच्या उच्चपदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही पहिली वेल नाही. याआधी इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी गेल्या वर्षी 70 तास कामाच्या आठवड्याचा सल्ला दिल्यानंतरही अशीच चर्चा झाली होती.
आपल्या देशात ऑफिसला पोहोचण्याची वेळ निश्चित असते पण तेथून निघण्याची काही वेळ असत नाही. त्यामुळे अनेकवेळा कर्मचारी निश्चित तासापेक्षा अधिक वेळ काम करत असल्याचा अनुभव सर्वांनाच येतो.ही गोष्ट फक्त भारतात नाही तर अन्य देशात देखील होतो. जगभरातील देशात सरासरी आठवड्याच्या कामाचे तास 40-50 दरम्यान आहेत. काही देशांमध्ये या निश्चित वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले जाते. तर विशेषतः विकसित देशांमध्ये आठवड्यातील वर्क ऑवर्स कमी असतात. काही देशांमध्ये तर आठवड्याला फक्त चार दिवस काम केले जाते. इतकेच नव्हे कर्मचाऱ्यांकडून जास्त वेळ काम करून घेतल्यास ओव्हरटाइमसाठी त्यांना भरपाई देण्याचीही व्यवस्था असते.
advertisement
भारतात किती तास काम
देशात सध्या 70 आणि 90 तास कामाच्या आठवड्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे आहे. मात्र आकडेवारी पाहिल्यास भारताचा समावेश आधीच जगातील सर्वाधिक तास काम करणाऱ्या देशांच्या यादीत आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या आकडेवारी नुसार भारतीय कर्मचारी आठवड्याला सरासरी 46.7 तास काम करतात.
advertisement
सर्वाधिक वीकली वर्क ऑवर्स असणारे देश
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या मते आठवड्याला सर्वाधिक तास काम करून घेतले जाणारे देशांमध्ये भूतान पहिल्या क्रमांकावर आहे. भूतानमध्ये 54.4 तासांचा वर्क वीक आहे. याशिवाय UAEमध्ये 50.9 तास, काँगोमध्ये 48.6 तास , कतारमध्ये 48 तास काम करून घेतले जाते. या यादीत भारत, बांगलादेश, पाकिस्तान, चीन यांसारख्या देशांचाही समावेश आहे.
advertisement
सर्वाधिक काम करणारे देश आणि आठवड्याचे कामाचे तास
भूटान- 54.4
युएई-50.9
काँगो-48.6
कतार-48
मॉरिटानिया-47.6
लेबनॉन-47.6
जॉर्डन- 47
भारत- 46.7
बांगलादेश- 46.7
पाकिस्तान-46.9
मकाओ- 46
चीन- 46.1
90 तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या सुब्रह्मण्यन यांना किती पगार मिळतो?
L&T चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना आठवड्याला 90 तास काम करण्याचा सल्ला दिला. घरी राहून पत्नीला किती वेळ पाहत बसणार? घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवा, त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यावर टीका वाढल्यानंतर कंपनीला निवेदन देण्याची वेळ आली. ज्यात त्यांनी म्हटले होते की, विकासाला चालना देण्यासाठी व विकसित राष्ट्र होण्यासाठी सामूहिक समर्पण व प्रयत्नांची आवश्यकता आहे. आमच्या चेअरमनचे वक्तव्य यासाठी होते.
मराठी बातम्या/मनी/
Longest Working Hours: आठवड्याला सर्वाधिक काम करणारा देश आहे भारताचा शेजारी, टॉप १० मध्ये देशांची यादी वाचा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement