advertisement

उत्पन्न 22 कोटी, 7 हजार 640 कोटींचा कर भरतो; जॅकलीन फर्नांडिसशी नाव जोडले गेलेल्या व्यावसायिकाचे अर्थमंत्र्यांना पत्र

Last Updated:

Sukesh Chandrasekhar: २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने परदेशातील २०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर कर भरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुकेशने या बाबत अर्थमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

News18
News18
नवी दिल्ली: व्यावसायिक सुकेश चंद्रशेखरने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहले आहे. या पत्रात सुकेशने आर्थिक वर्ष 2024-2025साठी स्वत:चे परदेशातील उत्पन्नाची घोषणा करण्याची परवानगी मागितली आहे. सुकेशवर सध्या विविध आरोपींवर सुनावणी सुरू आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांना लिहलेल्या पत्रात सुकेशने त्याच्या परदेशातील व्यवसायाची माहिती दिली आहे. या व्यवसायांमध्ये एलएस होल्डिंग्स इंटरनॅशनल आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन यांची अनुक्रमे अमेरिकेत आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स येथे नोंदणी आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग व बेटिंगशी संबंधित हे व्यवसाय 2016पासून कार्यरत आहेत. 2024 साली या व्यवसायांनी 2.7 अब्ज डॉलर्सची उलाढाल केली आहे. या व्यवसायाचे कार्यक्षेत्र अमेरिका, स्पेन, इंग्लंड, दुबई आणि हाँगकाँगपर्यंत विस्तारले आहे.
advertisement
आई-आजी समोर नगरसेवकाच्या मुलाला नग्न करून मारहाण, प्रकरण PM मोदींपर्यंत पोहोचले
सुकेशने या पत्रात भारतात सुरू असलेल्या आयकर वसूली प्रकरणावर तडजोड करण्याची तयारी दाखवली आहे. त्याने 2024 मधील परदेशातील उत्पन्नावर लागू होणारे भारतीय कर भरण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम 7 हजार 640 कोटी इतकी आहे. सुकेशने ही रक्कम भारतातील टेक आणि अॅडव्हान्स ऑनलाइन गेमिंग बिझनेसमध्ये गुंतवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
advertisement
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार ४२ दिवसांची स्पेशल सुट्टी, अशा आहेत अटी
ईडीकडून 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तसेच इतर तपास यंत्रणांकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. ईडीने दाखल केलेले प्रकरण हे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आर्थिक गुन्ह्या संदर्भातील आहे.ज्यात रिलिगेअर एंटरप्रायजेसच्या माजी प्रवर्तकाच्या पत्नी जपना सिंग आणि अदिती सिंग यांची फसवणूक आणि खंडणी वसूली संबंधित आहे. या दोघांनाही रिलिगेअर फिनवेस्ट लिमिटेडमधील निधी गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.
advertisement
फिल्डरचा प्रताप पाहून संघातील खेळाडूंवर तोंड लपवण्याची वेळ, Video
चंद्रशेखर आणि त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल या दोघांना दिल्ली पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केली होती. या ED आणि दिल्ली पोलिसांच्या तपासादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही आणि इतर व्यक्तींची नावे समोर आली होती.
view comments
मराठी बातम्या/मनी/
उत्पन्न 22 कोटी, 7 हजार 640 कोटींचा कर भरतो; जॅकलीन फर्नांडिसशी नाव जोडले गेलेल्या व्यावसायिकाचे अर्थमंत्र्यांना पत्र
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement