दगड-गोट्यांमधून विचार मांडणारा कलाकार
राकेश तिवारी नर्मदा नदीच्या प्रवाहात वाहत येणाऱ्या दगडांचा वापर करून कॅनव्हासवर सुंदर कथा आणि गोष्टी साकारतात. 'लोकल 18' शी बोलताना स्टोन आर्टिस्ट राकेश तिवारी म्हणाले की, ते मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर शहराचे आहेत. दगडांच्या मदतीने आपले विचार आणि कथा लोकांपर्यंत पोहोचवू शकेन, असा विश्वास त्यांना होता, म्हणूनच त्यांनी या कलेला सुरुवात केली. सध्या देशात असे चारच कलाकार आहेत, जे व्यावसायिकरित्या 'स्टोन आर्ट' करतात. राकेश त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
त्यांच्या कलेमुळे दगड व्यक्त करतात भावना
राकेश तिवारी सांगतात की, जसा एक लेखक आपल्या कथेतील पात्र आणि कथानक निवडण्यासाठी आणि गुंफण्यासाठी वेळ घेतो, त्याचप्रमाणे तेही नर्मदा नदीच्या किनारी दगड येण्याची महिनोन्महिने वाट पाहतात. अशाप्रकारे ते दगडांच्या मदतीने आपली कथा पूर्ण करतात. जगात अनेक लोक दगडांपासून कलाकृती बनवतात, पण त्यांच्या कलेचं वैशिष्ट्य हे आहे की, त्यांचे दगड भावनाही व्यक्त करतात.
दगडांना कोणताही धक्का नाही!
ते सांगतात की, ते या दगडांना कोणताही धक्का लावत नाहीत; ते फक्त त्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पॉलिश करतात. कधीकधी त्यांच्या कल्पनेनुसार कॅनव्हासवर डिझाइन साकारायला 6 महिने किंवा वर्षभरही लागतं. काही दगड हाताच्या आकाराचे असतात, तर काही पायाच्या. दगडांना कोणताही रंग लावला जात नाही आणि ते पूर्णपणे नैसर्गिक असतात.
राकेश तिवारी पुढे म्हणाले की, त्यांना नर्मदासारख्या पवित्र नद्यांमधून दगड गोळा करून ते लोकांच्या घरांपर्यंत पोहोचवायचे आहेत; म्हणूनच ते 'स्टोन आर्ट'च्या माध्यमातून एका विशेष प्रकारच्या कलेतून लोकांना एक नवीन कथा आणि संदेश पाठवत आहेत. ते सांगतात की, राहुल रॉयच्या 'आशिकी' चित्रपटात एक सीन होता, ज्याने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं होतं. त्या सीनने त्यांच्याही मनात जागा केली आणि ते चित्र कोरण्यासाठी त्यांना तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला.
हे ही वाचा : हवन केल्यानंतर दक्षिणा देणं का गरजेचं आहे? पूजा सफल करण्यासाठी 'हे' नियम माहीत असायलाच हवेत!
हे ही वाचा : ज्येष्ठ पौर्णिमेला नक्की करा तुळशीचा 'हा' उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न अन् व्हाल धनवान!