ज्येष्ठ पौर्णिमेला नक्की करा तुळशीचा 'हा' उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न अन् व्हाल धनवान!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हिंदू धर्मात ज्येष्ठ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, जी यावर्षी 11 जून रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषी आनंद भारद्वाज सांगतात की...
हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमा खास मानली जाते, पण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचं महत्त्व खूप मोठं आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. चंद्रदेवालाही नमस्कार केला जातो. या दिवशी उपवास करण्याचीही परंपरा आहे. उज्जैनचे प्रसिद्ध ज्योतिषी आनंद भारद्वाज यांच्या मते, ज्येष्ठ पौर्णिमेला तुळशीशी संबंधित काही खास उपाय केल्यास आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात भरभराट येते.
ज्येष्ठ पौर्णिमा कधी आहे?
यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा मंगळवार, 10 जून रोजी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुरू होईल आणि बुधवार, 11 जून रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार, ज्येष्ठ पौर्णिमा 11 जून रोजी साजरी केली जाईल.
तुळशीचे उपाय जे बदलतील तुमचं नशीब...
घरातील कटकट आणि अशांतता दूर करण्यासाठी : जर तुमच्या घरात सतत वाद-विवाद होत असतील, घरात शांतता नसेल, तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी एक नवीन तुळशीचं रोप आणा आणि ते उत्तर, ईशान्य (उत्तर-पूर्व) किंवा पूर्व दिशेला लावा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक, दैवी स्पंदनं वाढतात.
advertisement
अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणि प्रगतीसाठी : जर तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत अडचणी येत असतील, पैसे अडकले असतील, तर तुळशीची एक फांदी पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या पैशांच्या ठिकाणी, म्हणजे ऑफिस, दुकान किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळतात, तसेच करिअरमध्ये प्रगती होेते.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी : तुळशीची पूजा दररोज केली पाहिजे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुळशीची 11 पानं तोडा (पानं तोडण्यापूर्वी तुळशी मातेची माफी नक्की मागा). ही पानं एका लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीवर लावा. या उपायाने आर्थिक संकट दूर होत नाही, तर माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो.
advertisement
हे ही वाचा : असा योग पुन्हा नाहीच! 9 जूनपासून या 5 राशींच्या लोकांचे नशीब पलटणार, हाती पैसाच पैसा येणार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 09, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
ज्येष्ठ पौर्णिमेला नक्की करा तुळशीचा 'हा' उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न अन् व्हाल धनवान!