100 रुपयांपेक्षा कमीचा प्लॅन
टेलिकॉम ऑपरेटरने आपले यूझर्स टिकवून ठेवण्यासाठी विविध ऑफर जाहीर केल्या आहेत. एअरटेलचा असाच एक रिचार्ज प्लॅन आहे, ज्यासाठी यूझर्सला फक्त 99 रुपये खर्च करावे लागतील. टेलिकॉम ऑपरेटर आपल्या यूझर्सना 99 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट ऑफर करत आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट देण्यात आले आहे. मात्र, या प्लॅनमध्ये यूजर्सला फक्त 2 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. कंपनीने यूझर्ससाठी FUP लिमिट देखील सेट केली आहे.
advertisement
या iPhone मॉडल्सवर बंद होणार WhatsApp! पण कारणं काय?
या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 20GB इंटरनेट ॲक्सेस मिळेल. या प्लॅनचा लाभ फक्त आधीपासून चालू असलेल्या कोणत्याही योजनेसोबतच घेता येईल. उदाहरणार्थ, तुमच्या नंबरवर प्लॅन आधीपासूनच अॅक्टिव्ह असल्यास, तुम्ही हा प्लॅन निवडू शकता. एअरटेलने खासकरून इंटरनेट यूझर्सना लक्षात घेऊन हा प्लॅन लॉन्च केला आहे.
Netflix Scam पासून सावधान! हॅकर्सची नवी खेळी तुमचं अकाउंट करेल रिकामं
जिओ ऑफर
Airtel प्रमाणे, Jio कडेही असाच स्वस्त प्लॅन आहे. ज्यासाठी यूझर्सला 100 रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागतो. जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड इंटरनेट डेटाचा लाभ मिळणार आहे. हा प्लॅन 86 रुपयांचा आहे आणि Airtel प्रमाणे तुम्हाला दररोज 20GB डेटाचा लाभ मिळेल.