पण खरं तर हा हॅकिंग नाही, हा Google चा अपडेट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा बदल हॅकिंगमुळे नाही तर Google च्या नवीन अपडेटमुळे झाला आहे. मे 2025 मध्ये Google ने जाहीर केलं होतं की ते “Material 3D Expressive” नावाचा नवीन डिझाइन इंटरफेस घेऊन येत आहेत. याच अपडेटमुळे फोन ऍपचा कॉल इंटरफेस पूर्णपणे बदलला आहे.
advertisement
काय-काय बदललं आहे?
फोन ऍप उघडल्यावर आता फक्त “Home” आणि “Keypad” हे दोनच ऑप्शन्स दिसतात. आधीप्रमाणे “Recents” आणि “Favourites” असे वेगळे टॅब आता नाहीत, ते Home टॅबमध्येच समाविष्ट झाले आहेत.
एकाच नंबरवरून आलेले कॉल्स आता group दिसणार नाहीत, तर टाइमलाइनप्रमाणे स्वतंत्रपणे दिसतील. इनकमिंग कॉल स्क्रीनचे डिझाइन बदलले आहे, जेणेकरून फोन खिशातून काढताना चुकीने कॉल रिसीव किंवा कट होणार नाही.
परवानगी न घेता बदल का केला?
लोक विचारत आहेत की परवानगी न घेता स्क्रीन का बदलली?
खरं कारण म्हणजे, जर तुमच्या फोनमध्ये Google Play Store वर Auto-Update सुरू असेल, तर Google Phone App आपोआप अपडेट होते. त्यामुळे तुमच्या नकळत कॉल स्क्रीन बदलली गेली आहे.
जुनं इंटरफेस परत कसं आणायचं?
जर तुम्हाला नवीन डिझाइन आवडलं नसेल, तर काळजी करू नका.
फोनच्या Settings > App Settings मध्ये जाऊन “Uninstall Updates” वर क्लिक करा.
त्यानंतर Play Store उघडून Auto-Update बंद करा.
यामुळे ऍप पुन्हा जुन्या स्वरूपात परत येईल आणि पुढे तुमच्या परवानगीशिवाय अपडेट होणार नाही.
थोडक्यात, तुमचा फोन हॅक झालेला नाही. हा फक्त Google ने दिलेला एक नवा डिझाइन अपडेट आहे. आवडलं नाही तर जुनं इंटरफेस परत मिळवणंही तुमच्या हातात आहे.
