अॅपलच्या वेबसाइटवरून iPhone 16 प्रो, iPhone 16 Pro Max आणि iPhone 15 (बेस मॉडेल) यासह एकूण तीन मॉडेल काढून टाकण्यात आले आहेत.हे मॉडेल आता वेबसाइटवर दिसणार नाहीत, परंतु स्टॉकपर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करता येतील.
Apple Intelligence फक्त निवडक मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे
Apple चे iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे असे दोन जुने मॉडेल्स होते जे Apple Intelligence ला सपोर्ट करत होते. हे Apple चे पर्सनल इंटेलिजेंस तंत्रज्ञान आहे जे AI आधारित फीचर्सचा आणि तुमच्या पर्सनल डेटाचा वापर करून स्मार्ट अनुभव देते. आता वेबसाइटवर उपलब्ध असलेले iPhone 17, iPhone Air, iPhone 16 आणि iPhone 16e सारखे iPhone मॉडेल्स Apple Intelligence सपोर्टसह येतात.
advertisement
iPhone 17 Air: जुनी दारू पण बाटली नवी कोरी! apple चा हा iphone पाहून फोन विकून टाकाल!
आता Apple Intelligence कसे मिळवायचे
हे स्पष्ट आहे की, तुम्हाला Apple Intelligence चा अनुभव घ्यायचा असेल तर आता तुमच्याकडे
iPhone 17 series
iPhone Air
iPhone 16
iPhone 16e असे ऑप्शन आहेत.
iPhone 16 Pro आणि Pro Max आता अधिकृत स्टोअरमधून उपलब्ध नसतील, परंतु हे वैशिष्ट्य इतर मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.
iPhone 17 Air आला रे, सगळ्यात पातळ आणि वजनाने हलका, पडला तरी काहीच होणार नाही!
नवीन आगमनानंतर हे दोन्ही मॉडेल स्वस्त झाले
iPhone 17 लाँच झाल्यानंतर Apple ने त्यांच्या जुन्या मॉडेल iPhone 16 ची किंमत कमी केली आहे. आता भारतात, iPhone 16 ची किंमत ₹ 69,900 पासून सुरू होते, जी पूर्वी ₹ 79,900 होती. त्याच वेळी, iPhone 16 Plusची नवीन किंमत ₹79,900 आहे, जी पूर्वी ₹89,900 होती. म्हणजेच, या दोन्ही फोनवर 10,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.