यंदाही Apple ने 9 सप्टेंबर रोजी iPhone 17 सीरिजचे चार नवीन मॉडेल्स iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max लाँच झाले आहेत. यासोबत Apple Watch आणि AirPodsचेही अपडेटेड व्हर्जन्स येण्याची शक्यता आहे.
पण याच इव्हेंटमध्ये काही जुन्या डिव्हायसेसचा प्रवास थांबला आहे. कंपनी iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max, iPhone 15 आणि iPhone 15 Plus यांना डिस्कंटीन्यू करत असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच या मॉडेल्सचे प्रोडक्शन थांबेल, पण शिल्लक युनिट्स इतर प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध राहतील. त्यामुळे ग्राहकांना डिस्काउंटमध्ये हे फोन्स घेण्याची संधी मिळू शकते.
advertisement
याशिवाय iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांची जागा iPhone 17 Pro सीरिज घेणार आहे. Apple Watch SE 2, Apple Watch Series 10 आणि Apple Watch Ultra 2 चं प्रोडक्शन देखील बंद झालं आहे.
म्हणजेच या इव्हेंटनंतर iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max, iPhone 15 आणि iPhone 15 Plus हे फोन सर्वात किफायतशीर फोन असतील. दरवर्षीप्रमाणेच स्टँडर्ड मॉडेल्सच्या किंमतीत सुमारे 10 हजार रुपयांपर्यंत कपात झाल्या आहेत.
सध्या फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन सारख्या इकॉमर्स साईटवर iPhone 16 ची किंमत 49990 झाली आहे तर, iPhone 16 Pro ची किंमत 67990 रुपये आहे. तर iPhone 16 Pro Max 1,34,900 आहे. iPhone 15 आणि iPhone 15 Plus 59,900 आणि 69,900 अशी आहेत.