हे फीचर तुमचे सर्व खरेदीशी संबंधित ईमेल एकाच ठिकाणी दाखवून पॅकेजेस ट्रॅक करणे सोपे करते. विशेषतः सणासुदीच्या काळात, जेव्हा ऑनलाइन ऑर्डर्सचा पूर येतो, तेव्हा हे फीचर तुम्हाला माहिती सोप्या पद्धतीने पाहण्यास मदत करेल. चला जाणून घेऊया या नवीन टॅबची फीचर्स आणि ते तुमच्यासाठी फायदेशीर का ठरेल.
₹15000 हून कमी किंमतीत लॉन्च झाला Samsung चा सर्वात स्टायलिश Smartphone! पाहा फीचर्स
advertisement
हे फीचर हळूहळू मोबाइल आणि वेब दोन्हीवर सादर केले जात आहे. आता ऑर्डर कन्फर्मेशन, शिपमेंट आणि डिलिव्हरी अपडेट्स असे सर्व खरेदीशी संबंधित ईमेल तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये एकाच ठिकाणी दिसतील.
पूर्वी जीमेल तुमच्या इनबॉक्समध्ये पॅकेजची डिलिव्हरी स्टेटस दाखवत असे. जेणेकरून तुम्हाला माहिती शोधण्यासाठी वेगवेगळ्या कुरिअर साइट्सवर जावे लागत नाही. आता 'Purchases' टॅबमध्ये तुम्ही सर्व जुन्या आणि नवीन ऑर्डर सहजपणे पाहू शकता. 24 तासांत येणारे पॅकेजेस इनबॉक्सच्या वर दिसतील, परंतु उर्वरित डिलिव्हरी माहिती या टॅबमध्ये असेल.
तुमच्या घरातील Wifi जवळही या वस्तू आहेत? 99% लोक करतात चूक, होतं मोठं नुकसान
सणासुदीच्या काळात हा त्रास संपेल
गुगल म्हणते की, हे फीचर विशेषतः सणांच्या काळात खूप उपयुक्त ठरेल. सुट्टीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग खूप वाढते आणि हजारो ईमेल येतात.
याशिवाय, जीमेलच्या Promotions विभागात देखील बदल केले जात आहेत. आता तुम्ही 'Most Relevant' च्या आधारे प्रमोशनल ईमेल पाहू शकता. जेणेकरून तुमच्या आवडत्या ब्रँडच्या ऑफर लवकर दिसतील. याशिवाय, चालू विक्री आणि मर्यादित काळातील डीलची माहिती देखील वेळोवेळी दाखवली जाईल.