TRENDING:

BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! 100 रुपयांपेक्षाही कमी किंमत

Last Updated:

तुम्ही BSNL सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक उपयुक्त बातमी आहे. BSNL कडे 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत अशा अनेक आकर्षक प्लॅन्स उपलब्ध आहेत ज्यात तुम्हाला 30 दिवसांची व्हॅलिडिटी आणि अधिक इंटरनेट सुविधा दिल्या जातात. बीएसएनएलचे हे प्लॅन तुम्हाला महागड्या रिचार्जपासून वाचवू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एकीकडे खासगी टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅन महाग करून लोकांचे टेन्शन वाढवत असताना दुसरीकडे सरकारी कंपनी बीएसएनएल लोकांना दिलासा देताना दिसत आहे. BSNL अजूनही आपल्या ग्राहकांना जुन्या किंमतीत रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. BSNL आपल्या ग्राहकांना टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात स्वस्त योजना ऑफर करते. BSNL च्या लिस्टमध्ये तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्लॅन देखील मिळू शकतात.
बीएसएनएल
बीएसएनएल
advertisement

खाजगी टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी 200 रुपयांपर्यंत कमी रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. तर BSNL 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना 30 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. तुम्ही तुमच्या फोनमध्ये BSNL सिम वापरत असाल तर आम्ही तुम्हाला अशा 5 रिचार्ज प्लॅन्सविषयी सांगणार आहोत ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.

Flipkart चा भारी सेल सुरु! आयफोनपासून सॅमसंगपर्यंत सर्वच फोन्सवर डिस्काउंट

advertisement

BSNL चा 97 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या लिस्टमध्ये 97 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना दररोज 2GB डेटा ऑफर करते. तुम्हाला प्लॅनमध्ये 15 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. त्यानुसार तुम्हाला एकूण 30GB डेटा मिळतो. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 15 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग करू शकता. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर, तुम्ही 40Kbps च्या स्पीडने डेटा वापरु शकता.

advertisement

बीएसएनएलचा 98 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 98 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 18 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजे तुम्ही 18 दिवसात एकूण 36GB डेटा वापरू शकता. यामध्ये डेली डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 40Kbps चा इंटरनेट स्पीड मिळेल.

BSNL चा 58 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या लिस्टमध्ये तुम्हाला 58 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन मिळतो. Jio किंवा इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे अशा प्रकारचा प्लॅन नाही. BSNL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 7 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये तुम्हाला डेली डेटा लिमिट संपल्यानंतर 40kbps चा स्पीड मिळेल.

advertisement

कोणताच कॉल होणार नाही मिस, या सेटिंगने येईल मिस्ड कॉल्सचं रिमाइंडर

बीएसएनएलचा 94 रुपयांचा प्लॅन

तुम्हाला अधिक इंटरनेट डेटा हवा असेल तर तुम्ही बीएसएनएलच्या 94 रुपयांच्या प्लॅनवर जाऊ शकता. या रिचार्ज प्लॅनची ​​सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे त्याची व्हॅलिडिटी. या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 30 दिवसांची पूर्ण व्हॅलिडिटी ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला डेली 3GB डेटा मिळतो. म्हणजे तुम्ही 30 दिवसांत एकूण 90 जीबी डेटा वापरू शकता. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना लोकल आणि नॅशनल कॉलिंगसाठी 200 मिनिटे दिली जातात.

advertisement

BSNL चा 87 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या लिस्टमध्ये 87 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचाही ऑप्शन आहे. कंपनीच्या ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये 14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1GB हाय स्पीड डेटा दिला जातो. अशा प्रकारे तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 14GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना लोकल आणि एसटीडी कॉलिंग सुविधा पुरवते. या प्लॅनमध्ये तुम्हाला Hardy मोबाईल गेम्सची सर्व्हिस देखील मिळेल.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! 100 रुपयांपेक्षाही कमी किंमत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल