कोणताच कॉल होणार नाही मिस, या सेटिंगने येईल मिस्ड कॉल्सचं रिमाइंडर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हीही मिस्ड कॉल्स तपासण्यात आळशी असाल किंवा कॉलबॅक करणे लक्षात राहत नसेल तर ही ट्रिक वापरून पहा. यानंतर तुम्ही कोणताही कॉल मिस करणार नाही. या सेटिंगनंतर, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये मिस्ड कॉलचे वारंवार रिमाइंडर मिळतील. ही ट्रिक काय आहे आणि ती कशी काम करेल याचे डिटेल्स येथे वाचा.
मुंबई : कॉल्स मिस केले तर कॉल आला होता हेही लक्षात राहत नाही. ते कॉल डायलरमध्ये लाल रंगात दाखवले जातात. परंतु अनेक वेळा ते लक्षात येत नाहीत आणि महत्त्वाचे कॉल मिस होतात. पण आता तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार नाही, जर तुम्हीही तुमचे कॉल मिस करत असाल तर तुमच्या फोनमधील ही सेटिंग त्वरीत चालू करा. यानंतर, तुमचा एकही कॉल चुकणार नाही, तुम्हाला आलेल्या कॉलचे रिमाइंडर मिळेल, की कॉलबॅक करा.
मिस्ड कॉल्सचं रिमाइंडर
मिस्ड कॉलसाठी रिमाइंडर सेट करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये ट्रू कॉलर ॲप इन्स्टॉल करावे लागेल. जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप आधीपासूनच असेल तर ते ओपन करा. येथे उजव्या बाजूच्या कोपऱ्यात दाखवलेल्या थ्री डॉटवर क्लिक करा, नंतर सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करा.
advertisement
येथे तुम्हाला कॉल्सचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर, थोडे खाली स्क्रोल करा, स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली रिमाइंड मी ऑफ मिस्ड कॉल्सचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्याच्या पुढे दिसणारे टॉगल इनेबल करा. यानंतर तुम्हाला प्रत्येक मिस कॉलचे रिमाइंडर मिळेल. याच्या मदतीने कोणताही महत्त्वाचा कॉल मिस होणार नाही.
advertisement
लक्ष द्या
हा ट्रू कॉलर एक थर्डपार्टी अॅप्लिकेशन आहे. म्हणून त्याची रिव्ह्यू आणि रेटिंग तपासल्यानंतरच ते इंस्टॉल करा. याशिवाय ते फक्त Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करा.
स्पीड डायलमध्ये कॉन्टॅक्ट
- तुम्ही 2 दाबताच कॉल येईल, तुम्ही तुमच्या फोनमध्ये ही सेटिंग देखील करू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ट्रू कॉलर उघडावे लागेल.
advertisement
- उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर सेटिंग्ज ऑप्शनवर जा. येथे कॉल्स ऑप्शनवर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा, स्पीड डायल ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता 1 ते 10 पर्यंतचे अंक येथे दाखवले जातील, तुम्हाला निवडायचा असलेला क्रमांक निवडा, जसे की आम्ही येथे 2 निवडले आहेत. 2 च्या पुढे दाखवलेल्या आयकनवर क्लिक करा, नंतर कॉन्टॅक्ट नंबर अॅड आणि सेव्ह करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2024 3:05 PM IST