Smartphoneचा कॅमेरा साफ करुन फोटो काढता? महागात पडेल ही चूक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनने फोटो-व्हिडिओग्राफी करत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीर आहे. फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करताना कॅमेरा साफ करण्याच्या या पद्धतीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कॅमेरा साफ करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
मुंबई : कॉलिंग आणि मेसेजिंगसोबतच मोबाईल फोन हे फोटो-व्हिडिओग्राफीचेही माध्यम बनलेय. आजकाल फोन विकत घेण्यापूर्वी सर्वप्रथम त्याचा कॅमेरा चेक करावा. अशा परिस्थितीत, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा कोणी फोनवरून फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करते तेव्हा कॅमेरा आवश्य साफ करतो. पण तुम्ही कॅमेरा नीट साफ करत आहात का? तुम्ही कॅमेरा चुकीच्या पद्धतीने साफ केला तर त्याचा तुमच्या कॅमेऱ्यावर परिणाम होऊ शकतो. तुमचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया कॅमेरा स्वच्छ करायची योग्य पद्धत...
सर्वात कॉमन मिस्टेक म्हणजे, लोक नॉर्मली घाईघाईत फोनचा कॅमेरा हा बोटांनी स्वच्छ करतात. ज्यामुळे बोटांचे ठसे कॅमेरावर पडतात. दीर्घकाळ हीच चूक केली तर कॅमेरा खराब होऊ शकतो.
त्यामुळे फोनचा कॅमेरा खराब होतो
सर्वात मोठी आणि सामान्यतः केलेली चूक म्हणजे तुम्ही फोनचा कॅमेरा घाईघाईने बोटांनी किंवा कोणत्याही कपड्याने सच्छ करतात. अशावेळी कॅमेरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणता कपडा वापरत आहात हे पाहणं खूप गरजेचं आहे.
advertisement
कोणते फॅब्रिक वापरायचे?
कोणत्याही स्मार्टफोनचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे त्याचा कॅमेरा. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नेहमी मायक्रोफायबर कापड वापरावे. हे लेन्स स्वच्छ ठेवते आणि स्क्रॅचपासून संरक्षण देखील करते. एक गोष्ट लक्षात ठेवा की या कापड व्यतिरिक्त तुम्ही सुती कापड देखील वापरू शकता परंतु कोणतेही रफ किंवा खराब दर्जाचे टिश्यू पेपर वापरू नका.
advertisement
कॅमेरा लेन्स आणि लिक्विड
कॅमेरा लेन्स हलक्या हातांनी स्वच्छ कराव्यात आणि जबरदस्तीने साफ करू नये. कोणत्याही प्रकारचे लिक्विड किंवा पाण्याने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका, ही चूक तुम्हाला महागात पडू शकते आणि कॅमेरा देखील खराब होऊ शकतो. जर तुम्हाला लिक्विड वापरायचं असेल तर तुम्ही लेन्स क्लीनर किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस क्लीनर वापरू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2024 11:53 AM IST