10 हजाराच्या आत मिळतोय 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा स्मार्टफोन, पाहा यादी

Last Updated:

10 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये अनेक फीचर्स असलेल्या फोन्ससाठी रेडमी, पोको, रियलमी यांसारख्या कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.

News18
News18
मुंबई :  सध्याचं युग स्मार्टफोन्सचं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी स्मार्ट फोनवर अवलंबून असतात. शिवाय दररोज नव्या स्मार्टफोन्सची (Phone Under 10,000) बाजारात एंट्री होत असल्याने एकच फोन वर्षानुवर्षं वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फीचर्स असलेला मोबाइल घेण्याकडेच बहुतांश जणांचा कल असतो. फक्त 10 हजार रुपये बजेट असेल आणि तरीही 50 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला आणि दमदार बॅटरी क्षमतेचा फोन घ्यायची इच्छा आहे का? 10 हजार रुपयांमध्येही अशा गुण वैशिष्ट्यांचे फोन घेणं सहज शक्य आहे. अशा काही स्मार्टफोन्सची माहिती घेऊ या.
10 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये अनेक फीचर्स असलेल्या फोन्ससाठी रेडमी, पोको, रियलमी यांसारख्या कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. हे स्मार्टफोन्स अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि त्या त्या कंपन्यांच्या ऑफिशियल वेबसाइट्सवरून खरेदी करता येऊ शकतात. वेगवेगळ्या ऑफर्सचाही लाभ घेता येऊ शकतो. हे स्मार्टफोन्स कोणते, याबद्दल जाणून घेऊ या.
Realme C63 :  रिअलमी ब्रँडच्या या फोनची किंमत 10,999 रुपये आहे; मात्र बँक कार्ड डिस्काउंट मिळाल्यानंतर हा स्मार्टफोन ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतो. या फोनला 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा असून, आठ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या हँडसेटला 6.75 इंच आकाराचा मोठा स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे.
advertisement
Redmi A4 5G  :  रेडमी ब्रँडचा हा स्मार्टफोन फक्त 8499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्या फोनचा कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असून, त्यात 5160 mAh क्षमतेची बॅटरी आहे. या फोन वेगवान असून, त्यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन फोर एस जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Lava Yuva 5g  : लाव्हा कंपनीच्या या फोनची किंमत फक्त 8699 रुपयांपासून सुरू होते. या फोनला 50 मेगापिक्सेलचा ड्युएल कॅमेरा सेटअप असून, 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाइसला युनिसॉक टी 750 प्रोसेसर देण्यात आला आहे.
advertisement
Moto G45 5G  : मोटोरोला ब्रँडच्या या परवडणाऱ्या फाइव्ह जी फोनला 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसंच, या फोनला स्नॅपड्रॅगन सिक्स एस जनरेशन थ्री प्रोसेसर आणि 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 10,999 रुपये आहे; मात्र बँक ऑफर्सचा लाभ घेतला, तर हा फोन 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करणं शक्य आहे.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
10 हजाराच्या आत मिळतोय 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा स्मार्टफोन, पाहा यादी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement