TRENDING:

ना रिचार्ज ना सब्सक्रिप्शन! फ्रीमध्ये असे पहा Disney Plus Hotstar वर मूव्हीज

Last Updated:

Free Movies on Disney Plus Hotstar: तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर कोणतेही सबस्क्रिप्शन न घेता किंवा कोणताही रिचार्ज प्लॅन न खरेदी करता फ्री चित्रपटांचा आनंद घेऊ शकता? आश्चर्यचकित होऊ नका, हे होऊ शकते पण कसे? जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहणे देखील आवडते का? पण जर तुम्हाला पैसेही खर्च करायचे नसतील तर आम्ही तुम्हाला सांगतोय की, डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही फ्री चित्रपटांचा आनंद कसा घेऊ शकता? तुम्हाला आश्चर्य वाटणे साहजिक आहे. कारण सबस्क्रिप्शन घेतल्याशिवाय हे सर्व शक्य नाही असे प्रत्येकाला वाटते, पण तसे नाही. असा एक मार्ग देखील आहे ज्याद्वारे तुम्ही डिस्ने हॉटस्टारवर फ्री चित्रपटांचा आनंद घेऊ शकता, यामध्ये तुम्हाला ना सब्सक्रिप्शन घ्यायची गरज आहे ना तुम्हाला प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन खरेदी करावा लागेल.
हॉटस्टार
हॉटस्टार
advertisement

Free Movie कसे पहावे?

इतर OTT प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी, कंपन्या आता आकर्षक ऑफर आणि फ्री चित्रपट दाखवत आहेत. जे कंपन्यांसाठी फायदेशीर असू शकतात किंवा नसतील, परंतु प्रेक्षक त्याचा खूप आनंद घेत आहेत. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Disney Plus Hotstar ॲप डाउनलोड करा.

BSNL यूझर्सला इशारा! या बनावट वेबसाइटवर चुकूनही करु नका क्लिक

advertisement

यानंतर, डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुमचे आधीच अकाउंट नसल्यास, प्रथम अकाउंट तयार करा. अकाउंट तयार केल्यानंतर तुम्ही साइन इन करताच, तुम्हाला ॲपच्या होमपेजवर चित्रपट दिसू लागतील.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता, परंतु काही चित्रपटांवर तुम्हाला Free लिहिलेलेही दिसेल. ज्या चित्रपटावर FREE लिहिले आहे त्याचा आनंद तुम्ही विनामूल्य घेऊ शकता. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सर्व चित्रपट विनामूल्य नसतात, तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर फक्त निवडक चित्रपट विनामूल्य पाहू शकाल.

advertisement

धोकादायक आहे Juice Jacking Scam! फोनला चार्जिंग सुरु असतानाच तुम्हाला लागेल चुना

Web Series पाहण्यासाठी काय करावे?

चित्रपटांसोबत, जर तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर वेब सीरिजही पाहायच्या असतील, तर तुम्हाला यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता असेल. सर्वात स्वस्त प्लॅनची ​​किंमत 149 रुपये आहे, परंतु हा प्लॅन फक्त मोबाइल सपोर्टेड आहे आणि तीन महिन्यांसाठी चालेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला कंटेंटचा आनंद घेताना जाहिराती पहाव्या लागतील.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ना रिचार्ज ना सब्सक्रिप्शन! फ्रीमध्ये असे पहा Disney Plus Hotstar वर मूव्हीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल