जर तुमच्या iPhone ची बॅटरी अचानक पूर्वीपेक्षा लवकर संपायला लागली तर हे केवळ जास्त वापरामुळे नाही तर. हे बॅटरी खराब होणे किंवा मदरबोर्डमध्ये बिघाडाचे लक्षण असू शकते. iPhone सेटिंग्जमध्ये जाऊन Battery Health तपासा. जर ती 80% खाली आली तर बॅटरी बदलणे आवश्यक आहे.
ओव्हरहीटिंग समस्या
चार्जिंग करताना किंवा हेवी ऍप वापरताना iPhone गरम होणे सामान्य आहे. पण जर तो साध्या वापरातच गरम होऊ लागला तर हे प्रोसेसर, बॅटरी किंवा इंटरनल सर्किटमधील त्रुटीचे संकेत आहेत. जास्त दिवस असे झाल्यास पार्ट्स खराब होऊ शकतात.
advertisement
अचानक रीस्टार्ट होणे
iPhone आपोआप रीस्टार्ट होऊ लागला तर हे बॅटरी, मदरबोर्ड किंवा iOS सिस्टीममधील बगचे लक्षण असते. अशी समस्या वारंवार झाल्यास लगेच सर्विस सेंटरला दाखवणे गरजेचे आहे.
ऍप क्रॅश आणि स्टोरेजची समस्या
जर पुरेसा स्टोरेज असूनही ऍप्स वारंवार क्रॅश होत असतील किंवा फोन हँग होत असेल, तर ही इंटरनल स्टोरेज चिपची समस्या असू शकते. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
स्क्रीन फ्लिकर आणि टच रिस्पॉन्स स्लो होणे
स्क्रीन चमकणे किंवा टच योग्य प्रतिसाद न देणे हे डिस्प्ले कनेक्शन किंवा इंटरनल चिप खराब होण्याचे लक्षण आहे. बरेच जण याला सॉफ्टवेअर बग समजतात पण हे हार्डवेअर फेल होण्याचे संकेत असू शकतात.
चार्जिंगमध्ये अडथळे
केबल आणि ऍडॅप्टर नीट असूनही चार्जिंगमध्ये समस्या येत असेल तर ही बॅटरी कनेक्शन किंवा चार्जिंग पोर्टची खराबी असू शकते. धूळ किंवा ओलसरपणामुळे पोर्ट खराब होतो.
अशा समस्या टाळण्यासाठी काय करावे?
जर iPhone मध्ये हे संकेत दिसले तर लगेचच डेटा बॅकअप घ्या आणि Apple सर्विस सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्या. वेळेवर लक्ष दिल्यास मोठा खर्च वाचू शकतो.